12 December 2024 10:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
x

नितीशकुमारांनी अनेकांना दगा दिला आहे | त्यामुळे बिहारमध्ये राजकीय भूकंप शक्य

Bihar Assembly Election 2020, Political Earthquake, MP Sanjay Raut

पाटणा, १३ नोव्हेंबर : नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीनंतर (Bihar Assembly Election 2020) मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवलाय. मंत्रीमंडळाच्या बैठकीत विधानसभा भंग करण्याची शिफारस करण्यात आल्यानंतर नितीशकुमार यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवलाय.

यापूर्वी, आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत दिवाळीनंतर आपला नवा नेता निवडण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. आता यानंतर पुढची बैठक दिवाळीनंतर अर्थात १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिली.

दरम्यान, नितीशकुमार हे जेव्हा अस्वस्थ असतात तेव्हा ते निर्णय घेऊन मोकळे होतात. त्यामुळे बिहारमध्ये राजकीय भूकंप होणं शक्य आहे असं देखील शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नितीशकुमारांनी माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत दगाफटका केला. राजदचे नेते लालूप्रसाद यादव आणि ते तर सत्तेत होते लालूप्रसाद यादव यांच्यासोबतही त्यांनी दगा केला. एनडीएलाही त्यांनी दगा दिला होता. त्यामुळे नितीशकुमार नेमकं काय करतील याची शाश्वती आत्ता तरी देता येत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. टीव्ही नाइन मराठीशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

 

News English Summary: When Nitish Kumar is upset, he is free to make decisions. Shiv Sena MP Sanjay Raut has also said that a political earthquake is possible in Bihar. Nitish Kumar had a scuffle with former defense minister George Fernandes. He also betrayed RJD leader Lalu Prasad Yadav and Lalu Prasad Yadav who was in power. He also betrayed the NDA.

News English Title: Political Earthquake may possible soon in Bihar says MP Sanjay Raut News updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x