29 March 2024 1:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

राज्यपालांनी तसं केल्यास तो निर्णय अनैतिक आणि घटनाबाह्य ठरेल: घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट

Bhagar Singh Koshari, CM Uddhav Thackeray, MLC

मुंबई, २० एप्रिल: राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुक्त जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव सुचविल्यानंतरही ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती न करण्यात आल्याने संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर काल टीका केली होती. ‘राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, असं सांगतानाच का कळत नाही, पण मला रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालाची आठवण येते, असं ट्विट राऊत यांनी केलं होतं.

यावर नारायण राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते की, ‘राज्यपाल आणि राजभवन यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊतला माहीत नाही काय? सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही. समझने वालों को इशारा काफी है!’

मात्र यावरून राज्यघटना अभ्यासक जे मत व्यक्त करत आहेत ते उद्धव ठाकरे यांना दिलासा देणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यास राज्यपालांनी अद्याप मंजुरी दिलेली नाही. यावर घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी राज्यघटनेतील तरतुदींचा हवाला देत ठाकरेंची नियुक्ती तात्काळ केली जावी असं मत व्यक्त केलं. प्रा उल्हास बापट म्हणाले, राज्यपालांनी उद्धव ठाकरेंची नियुक्ती विधानपरिषद सदस्य म्हणून केली नाही तर ते अनैतिक आणि घटनाबाह्य ठरेल. इतकंच नाही तर त्याला राज्यपालांच्या अधिकारांचा गैरवापर म्हणावा लागेल असं म्हटलं आहे.

 

News English Summary: However, the opinion expressed by the Constitution students will give comfort to Uddhav Thackeray. The Governor has not yet approved the appointment of Chief Minister Uddhav Thackeray to the Legislative Council. On this occasion, the expert Pvt. Ulhas Bapat said that Thackeray’s appointment should be made immediately, citing the provisions of the Constitution. Prof Ulhas Bapat said, “If the Governor does not appoint Uddhav Thackeray as a member of the Legislative Council, it would be immoral and out of date.” Not only that, he is said to have abused the authority of the governor.

News English Title: Story Governor should appoint CM Uddhav Thackeray as MLC says expert News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x