नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पुन्हा एकदा ‘उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून निवड करण्यात आली आहे. सतराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून सुळेंची निवड करम्यात आली आहे. २०१९ मध्ये झालेल्या १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधून विजय मिळवला होता. संसदेच्या पहिल्या सत्रांमध्ये सुप्रिया सुळे यांनी ३४ चर्चासत्रात भाग घेतला. चार खासगी विधेयकं मांडली. १४७ प्रश्न उपस्थित केले आहेत. पहिल्या सत्रांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेतील उपस्थिती १०० टक्के राहिली आहे.

१६ व्या लोकसभा सत्रामध्ये १०१६, १०१७, आणि २०१८ मध्येही सुळे यांची सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून निवड करण्यात आली होती. मागील लोकसभेत सुळे यांनी ११८१ प्रश्न विचारले होते. तर २२ खासगी विधेयकं मांडली होती. १५२ वेळा चर्चेत सहभाग नोंदवला होता. तसेच संसदेत १०० टक्के हजेरी लावली होती. गेल्या संसदेतमधील खासदारांची हजेरी ८० टक्के होती.

मागील वर्षी खासदार सुप्रिया सुळे यांचा युनिसेफ या जागतिक संघटनेने ‘पार्लमेंटिरियन अवॉर्ड फॉर चिल्ड्रेन’ने गौरव केला आहे. अनेक अपंग मुलांसाठी बारामती खासदार क्षेत्रात भरपूर मदतकार्य सुप्रिया सुळे यांनी केल्याने त्यांच्या कामाची दखल युनिसेफने घेतली होती. त्याच्या या कार्याची दखल खुद्द संयुक्त राष्ट्र संघाने घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केले होत.

सुप्रिया सुळेंनी केवळ ८ तासांमध्ये बारामतीतील तब्बल ४,८४६ कर्णबधिर मुलांना श्रवणयंत्र बसवण्याची किमया सध्या केली होती. या उपक्रमासाठी अमेरिकेतील स्टार्की फाउन्डेशन,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट तसेच पवार पब्लिक चॅरिटेबल ट्र्रस्ट या सेवाभावी संस्थांची मदत सुद्धा त्यांनी घेतली होती. त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली असून इतक्या कमी वेळात ४,८४६ मुलांना श्रवणयंत्र बसवण्याच्या विक्रमाची नोंद ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये याआधीच नोंद करण्यात आली होती.

तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयी सुविधा,विद्यार्थिनींना केलेला सायकल वाटप या सगळ्या कार्याची दखल खुद्द युनिसेफने घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता.

खासदार सुप्रिया सुळे यांची यावर्षी देखील ‘उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून निवड