27 July 2021 1:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मोदींचा ‘लस उत्सव’ साजरा करण्यासाठी तरी भाजप नेत्यांनी दिल्लीतून १ कोटी लस आणाव्या - शिवसेना

Shivsena, BJP, PM Narendra Modi, Lus Utsav

मुंबई, १० एप्रिल: देशात आणि राज्यात दररोज विक्रमी संख्येनं आढळू येणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला असून, रुग्णांचे हाल होत असल्याचं चित्र राज्यातील काही शहरांमध्ये दिसत आहे. त्यातच केंद्र आणि महाराष्ट्रात ‘लस’कारणारून जुंपली आहे. महाराष्ट्रात लसीच्या तुटवड्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद करण्यात आली असून, राजकारण तापलं आहे. लसीच्या मुद्द्यावरून आता शिवसेनेनं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर यांच्यासह भाजपाच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

लसीच्या पुरवठ्यावरुन महाराष्ट्र सरकार विरुद्ध केंद्र सरकार आमने सामने आले आहेत. महाराष्ट्राला लसीचा मुबलक पुरवठा होत नाहीय. त्यामुळे लसीचा तुटवडा जाणवतोय. तर लसीअभावी अनेक ठिकाणची लसीकरण केंद्र बंद पडली. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला झाप झाप झापलंय. ‘लस’ जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी नाही. जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावे लागेल, असं आजच्या अग्रलेखात म्हटलंय.

कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात, मुंबईत लसीचा ठणठणाट आहे व पंतप्रधानांनी ‘लस उत्सव’ साजरा करण्याचे फर्मान सोडले. पंतप्रधानांचा ‘लस उत्सव’ साजरा करण्यासाठी तरी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीत जाऊन एक कोटी लसींचे पार्सल घेऊन यावे. राजकीय भांडणे आहेत, पण त्या भांडणात आपल्याच लोकांचे जीव का घ्यायचे? महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेने कधीतरी आजच्या विरोधी पक्षालाही सत्तेवर बसवलेच होते. तेवढे तरी इमान राखा. ‘लस’ जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी नाही. जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावे लागेल .

 

News English Summary: BJP leaders in Maharashtra should go to Delhi and bring a parcel of one crore vaccines to celebrate the Prime Minister’s ‘Vaccination Festival’. There are political quarrels, but why take the lives of our own people in those quarrels? The 12 crore people of Maharashtra had once put today’s opposition party in power.

News English Title: Shivsena slams BJP over statement of PM Narendra Modi about celebrating Vaccine Utsav news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1121)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x