28 April 2024 5:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

कन्नौजः ट्रक-बसच्या भीषण अपघातात २० जणांचा होरपळून मृत्यू, २१ जण जखमी

Kannauj in Uttar Pradesh, Vehicle Accident

कन्नौजः उत्तर प्रदेशमधील कन्नौजमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात २० जण ठार झाले तर अनेक जण जखमी आहेत. ट्रक आणि खासगी बसमध्ये हा अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागल्याने अनेक प्रवासी आगीत होरपळले. दरम्यान, मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ४३ प्रवासी होते, अशी माहिती आहे. काही प्रवाशांना बसमधून सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले तर बहुतांश प्रवासी बसमध्ये अडकल्याचे समजते.

ट्रक आणि बसच्या अपघातानांतर बसला आग लागली. दरम्यान, आगीची तीव्रता अधिक असल्यानं बसमधील प्रवाशांना बाहेर पडणं कठीण झालं होतं. त्यामुळे अनेक प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. यामध्ये २० प्रवशांचा मृत्यू झाला. तर २१ जण जखमी झाले आहेत.

हा अपघात शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास घडला. अपघातानंतर बस आणि ट्रकला आग लागली. त्यामुळे बसमध्ये अडकलेले प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पूर्णपणे जळून गेले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. आता डीएनए चाचणी करून मृतांची ओळख पटवावी लागेल. त्यानंतरच मृतांचा आकडा समोर येऊ शकतो, असे कानपूरचे रेंजचे आयजी मोहित अग्रवाल यांनी सांगितले.

 

Web Title:  Bus and Truck caught fire after heavy accident many feared dead at Kannauj in Uttar Pradesh.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x