15 December 2024 3:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

कोरोनाची लक्षणं आढळल्याने भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा रुग्णालयात दाखल

BJP Spokesperson Sambit Patra, Hospitalized, Covid 19

नवी दिल्ली, २८ मे: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पात्रा यांच्या शरीरात कोविड १९ ची लक्षणे दिसल्यानेच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे वृत्त आहे. पात्रा हे भाजपा प्रवक्त्यांच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असून ते सातत्याने न्यूज चॅनेवरील चर्चासत्रात पक्षाची बाजू मांडत असतात.

गुडगावमधील मेदांता रुग्णालयात पात्रा यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली. करोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर हा निर्णय घेण्याच आल्याची माहिती सुत्रांनी दिल आहे. इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

वृत्तवाहिन्यांमधील चर्चासत्रातून आणि आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सातत्याने भाजपाची बाजू मांडणारे व काँग्रेसविरोधी भूमिका घेणारे संबित पात्रा रुग्णालयात भरती झाले आहेत. पात्रा यांनी एक तासापूर्वीच भाजपा नेते भुपेंद्र यादव यांच्या पत्रकार परिषदेचं ट्विट रिट्विट केलं आहे. तर, आज सकाळपासूनचे ते ट्विटरवर ऍक्टिव्ह दिसत आहेत. स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्या जयंतीदिनी अभिवादनही आपल्या ट्विटर अकाऊंटरुन त्यांनी केले आहे. संबित पात्रा यांना रुग्णालयात भरती केले असून त्यांची कोरोना चाचणी घेण्यात येणार असल्याचे समजते. सध्या, ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.

 

News English Summary: Bharatiya Janata Party national spokesperson Sambit Patra has been admitted to hospital. Patra was admitted to the hospital with symptoms of Covid 19.

News English Title: BJP Spokesperson Sambit Patra Hospitalized After Covid 19 Symptoms News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x