12 December 2024 8:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

कोरोना परिणाम: बोईंग कंपनी १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार

Corona Crisis, Covid 19, Boeing Job Cuts

न्यूयॉर्क, २८ मे: अमेरिकेमध्ये कोरोना महामारीमुळे उद्योगावर मोठा परिणाम झाल्याने अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. अशा परिस्थितीत विमानची निर्मिती करणाऱ्या बोईंग या कंपनीनेही कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला असून अमेरिकेतील १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. तसेच या १२ हजार कर्मचाऱ्यांपैकी ५ हजार ५२० कर्मचाऱ्यांना बोईंग स्वेच्छानिवृत्ती देणार आहे.

विमान वाहतूक कंपन्यांनी नवीन विमान खरेदी थांबविली आहे. पूर्वीच्या विमान खरेदीच्या ऑर्डरही कंपन्यांनी रद्द केल्या आहेत. त्याचा बोईंग कंपनीला मोठा प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे बोईंगने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. बोईंगने मनुष्यबळात १० टक्के कपातीची घोषणा केली आहे. त्यामुळे एकूण १ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. येत्या काही महिन्यात हजारो जणांना कामावरून काढण्यात येणार असल्याचे बोईंगच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

कोरोनामुळे विमान वाहतूक क्षेत्रातील ही सर्वात मोठी नोकरकपात असल्याचं मानलं जात आहे. दीर्घकालीन ७३७ मॅक्स संकटामुळे बोईंगचे आर्थिक गणित अक्षरशः बिघडलेले आहे. त्याचवेळी कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाला आहे आणि यामुळे कंपनीचं कंबरडे मोडलं आहे. दोन मोठ्या अपघातांनंतर ७३७ MAX विमानं एका वर्षापेक्षा जास्त काळापासून जमिनीवर उभी आहेत. कंपनीने ७३७ विमानांचे उत्पादन पुन्हा सुरू केले आहे.

कोरोनामुळे भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रावरही वाईट परिणाम झाला आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय विमानन प्रवास ट्रॅव्हल सोसायटीचा (आयएटीए) अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालानुसार कोरोनामुळे भारतीय विमान कंपन्यांना यावर्षी १,१२२ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ८६ हजार कोटी) तोटा होईल आणि २९ लाखांहून अधिक लोक बेरोजगार होऊ शकतात.

 

News English Summary: In the US, the Corona epidemic has hit the industry hard, with many companies cutting staff. Boeing, the maker of the aircraft, has also decided to lay off 12,000 workers in the United States.

News English Title: Corona virus pandemic Boeing cuts 12000 jobs resumes production troubled 737 max airplane News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x