12 December 2024 1:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

SJVN Share Price | SJVN शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, कंपनीकडून सरकारात्मक अपडेट आली, पुन्हा मल्टिबॅगर?

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन या मिनीरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 13 टक्क्यांच्या वाढीसह 115.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच एसजेव्हीएन कंपनीला सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. ( सजेव्हीएन कंपनी अंश )

एसजेव्हीएन कंपनीची नवीकरणीय ऊर्जा शाखा असलेल्या एसजेव्हीएन ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला गुजरात राज्य ऊर्जा विकास निगम लिमिटेड कंपनीने 500 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी लेटर ऑफ इंटेंट जारी केले आहे. आज शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 3.12 टक्के घसरणीसह 114.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एसजेव्हीएन कंपनीला मिळालेल्या प्रकल्पाचे एकूण मूल्य 2700 कोटी रुपये आहे. हा प्रकल्प गुजरात राज्यात खवरा येथील जीआयपीसीएल सोलर पार्कमध्ये विकसित केला जाणार आहे. यापूर्वी एसजेव्हीएन ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने 25 जानेवारी 2024 रोजी गुजरात राज्य ऊर्जा विकास निगम लिमिटेडकडून 500 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प टॅरिफ आधारित स्पर्धात्मक बोलीद्वारे जिंकला होता. एसजेव्हीएन कंपनीला हा प्रकल्प BOT तत्त्वावर 2.54 रुपये प्रति युनिट दराने देण्यात आला आहे.

एसजेव्हीएन या मिनीरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अवघ्या एका वर्षात 265 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 14 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 31.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 14 मार्च 2024 रोजी हा स्टॉक 115.45 रुपये किमतीवर पोहचला होता.

मागील 6 महिन्यांत एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 48 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 170.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 30.39 रुपये होती. मागील 4 वर्षात एसजेव्हीएन स्टॉक तब्बल 470 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 20.35 रुपयेवरून वाढून 115.45 रुपये किमतीवर पोहचले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 15 March 2024.

हॅशटॅग्स

SJVN Share price(60)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x