26 April 2024 8:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या गटनेतेपदी पुन्हा निवड

MLA Eknath Shinde, Thane Eknath Shinde, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: शिवसेनेच्या विधानसभेतील गटनेतेपदी कुणाची निवड होणार? याविषयी गेल्या २ दिवसांपासून राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू होती. आदित्य ठाकरेंची देखील गटनेतेपदी निवड होऊ शकते, अशी शक्यता देखील वर्तवली जात होती. मात्र, अखेर विद्यमान गटनेते एकनाथ शिंदे यांचीच एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या सर्व विजयी आमदारांची शिवसेना भवनावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीमध्येच एकनाथ शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

सुनिल प्रभू यांची पक्षप्रतोदपदी निवड करण्यात आली. शिवसेना विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड होण्याच्या शक्यता अनेकांनी यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. त्यांचा गटनेते पदाचा अनुभव, राजकीय अभ्यास, पक्षातलं स्थान लक्षात घेऊन एकनाथ शिंदेच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याप्रमाणे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

भाजप-शिवसेना या दोन भावांमधील सत्तास्थापनेचा तिढा सुटायला तयार नाही. फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला, मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच, मंत्रिपद वाटपाची समीकरणं याभोवतीच राज्याचं राजकारण फिरतंय. या दरम्यान, भारतीय जनता पक्ष आणि एनसीपीने काल आपापले विधिमंडळ गटनेते निवडले. भारतीय जनता पक्ष आमदारांच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली, तर एनसीपीचे गटनेते म्हणून अजित पवार यांची निवड झाली. म्हणजेच, भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन केल्यास देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री असतील आणि महाआघाडी विरोधी बाकांवर बसल्यास अजित पवार विधानसभेतील विरोधी पक्षनेते असतील.

हॅशटॅग्स

#EknathShinde(15)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x