15 December 2024 4:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
x

पैसे उकळण्यासाठी खंडणीचा अवलंब म्हणजे लैंगिक संबंधासाठी बलात्कार करण्यासारखे आहे - अमृता फडणवीस

Amruta Fadnavis, Parambir Singh, Anil Deshmukh

मुंबई, २२ मार्च: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे सध्या राज्यात खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र जोपर्यंत तपास पूर्ण होऊन सत्य समोर येत नाही तोपर्यंत राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे.

दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर यांनी आरोप केले आहेत. पवारांच्या निवासस्थानी पंढरपूर पोटनिवडणुकीवर चर्चा झाली,असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी रात्री दिल्ली विमानतळावर जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना केला होता.

दरम्यान, कर्नाटकातील सेक्स फॉर जॉब प्रकरणात भाजपच्या मंत्र्याची टेप समोर आल्यानंतर देशात खळबळ माजली होती. मात्र या प्रकरणात स्त्री म्हणून कोणतीही भूमिका न मांडणाऱ्या अमृता फडणवीस यांनी राज्यातील घटनांची तुलना थेट लैंगिक संबंध आणि बलात्काराशी केली आहे. यासंदर्भात ट्विट करताना म्हटलं आहे की, “पैसे उकळण्यासाठी खंडणीचा अवलंब म्हणजे लैंगिक संबंधासाठी बलात्कार करण्यासारखे आहे….त्या दोन्ही गोष्टी आपल्याला नुकसानकारक ठरतात…

 

News English Summary: Resorting to Extortion to get funds , is like Committing Rape to get sex ! Both injure the spirit & well-being of the innocent & the weak said Amruta Fadnavis.

News English Title: Amruta Fadnavis tweet on allegations of Parambir Singh against Anil Deshmukh news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x