27 April 2024 12:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

दसऱ्याच्या भाषणात ना धड हिंदुत्व | ना धड धर्मनिरपेक्षता | भाजपाचं टीकास्त्र

BJP MLA Atul Bhatkhalkar, CM Uddhav Thackeray, Shivsena Dasara Melava 2020

मुंबई, २६ ऑक्टोबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसऱ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही शिवसैनिकांना संबोधित केले. मात्र, यावेळी कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ते दादर येथील सावरकर ऑडिटोरियममधून बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जबरदस्त हल्ला चढवला. त्यांनी हिंदुत्व, कोरोना लस, बिहार निवडणूक, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला. यानंतर आता भाजपनेही उद्धव ठाकरेंवर पलटवर केला आहे.

“शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दसरा मोळाव्यातील भाषण म्हणजे, केवळ गडबड गोंधळलेल्या पक्षप्रमुखाच्या भाषणाचा उत्तम नमुना होता. त्यांच्या भाषणात ना धड हिंदुत्व होतं, ना धड विकास होता, ना धड धर्मनिरपेक्षता होती. मी त्यांना सांगू इच्छितो, की काळ्या टोपी खाली मेंदू असतोच, पण तो मेंदू सत्ता मिळावी म्हणून टोप्या फिरवणारा नसतो, असा पलटवार भाजप आमदार अतुल भाटखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा (Shiv Sena Dussehra Rally) यंदा प्रथमच शिवतीर्थावर नाही तर सभागृहात पार पडला. उद्धव ठाकरेंचे भाषण शिवसैनिकांनी ऑनलाईन स्वरुपात पाहिले. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर (PoK)सोबत करणाऱ्या कंगना रानौतवर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधत टीका केली होती. यासोबतच भाजपवर सुद्धा उद्धव ठाकरेंनी टीकेचे बाण सोडले होते.

नेमकं काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे:
मुंबई पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे असं म्हणत आहेत. मोदींनी २०१४ साली सांगितलं होतं की पाकव्याप्त काश्मीर भारतात आणल्याशिवाय राहणार नाही. पाकव्याप्त काश्मीर लांब राहिलं. पण भारतातील जो काश्मीर आहे तिकडे ज्यांना मुंबई पाकव्याप्त वाटते त्यांना म्हणावं अनधिकृत सोडून द्या, ३७० कलम काढलेलं आहे. अधिकृत एक इंच जमीन तरी काश्मीरमध्ये घेऊन दाखवा आणि मग आणच्या अंगावर या.

निवडणुकीनंतर कोरोनाची लस बिहारमध्ये मोफत देणार मग आमचा बाकीचा देश काय बांगलादेश आहे की पाकिस्तान आहे की कझाकिस्तान आहे. लाज वाटली पाहिजे अशा लोकांना कारभार करायची ज्यांची लायकी नाहीये. जे देशात जर असं विभाजन करत असतील यांना फुकट आणि तुम्हाला विकत. केंद्र सरकार तुम्ही आहात, मायबाप तुम्ही आहात अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

 

News English Summary: On Sunday, Chief Minister Uddhav Thackeray addressed Shiv Sainiks on the occasion of Dussehra like every year. However, this time he was speaking from the Savarkar Auditorium in Dadar against the backdrop of the Corona crisis. This time he launched a strong attack on the Bharatiya Janata Party (BJP). He targeted BJP on Hindutva, Corona vaccine, Bihar election, Sushant Singh Rajput issue. After this, now BJP has also turned on Uddhav Thackeray.

News English Title: BJP MLA Atul Bhatkhalkar criticized CM Uddhav Thackeray after Shivsena Dasara Melava 2020 News updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x