21 April 2021 9:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आमच्याकडे ऑक्सिजन संपला आहे, तुमचे रुग्ण घेऊन जा | यूपीत अनेक इस्पितळांचा पत्रकांचा सपाटा Health first | दातांचा पिवळेपणा नाहीसा करण्यासाठी करा हे घरगुती उपाय । नक्की वाचा नाशिक दुर्घटना अतिशय वेदनादायी, पण बेपर्वाई करणाऱ्यांना कडक शासन व्हायलाच हवं - राज ठाकरे Health first | प्रवास करताना मळमळ किंवा उल्टी होतेय तर हे करा घरगुती उपाय । नक्की वाचा PPE किट, व्हेंटीलेटर्स, लस ते ऑक्सिजन असं सर्वच प्रथम परदेशात पाठवलं | सर्वांची टंचाई भारतीय भोगत आहेत नाशिक दुर्घटना | मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त | मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर Health first | चहाचा अतिरेक करू नका नाहीतर आरोग्यावर होतील त्याचे वाईट परिणाम । नक्की वाचा
x

तुम्ही मुलींवर अत्याचार करणारा श्रावणबाळ जन्माला घातलाय का | आ. नितेश राणेंचा हल्लाबोल

MLA Nitesh Rane, CM Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Nilesh Rane

मुंबई, २६ ऑक्टोबर : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंची बेडकाशी तुलना केल्यानंतर राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. “तुम्ही काय नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रावणबाळ” जन्माला घातला आहे का?,” असा सवाल ठाकरे यांना केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

“दुसऱ्यांची ‘पिल्ल’ वाईट. मग यांनी काय त्या दिनोच्या खुशीत नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रवणबाळ” जन्माला घातला आहे का? इतकी खुमखुमी आहे ना मग ती Disha Salainची केस मुंबई पोलिसांवर कुठला ही दबाव न टाकता निःपक्षपाती चौकशी करुन दया. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!,” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे:
तुम्हाला माहिती एक गाणं होतं. त्यानुसार आता मी म्हणतो की, ‘बेडकाच्या पिल्लाने वाघ पाहिला, वाघाची डरकाळी पाहून लपला.’ या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला आणि त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतो. पण काय तो आवाज… नुसता चिरका.. तुम्हाला आताच सांगतो वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर तो काय मांजरासारखा शेपूट फिरवत बसणार नाही. फटका मारणारच.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता नारायण राणे आणि त्यांच्या पुत्र्यांवर टीका केली.

शिवाजी पार्क जवळील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात यंदाचा दसरा मेळावा पार पडला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा होता. या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर प्रहार केल्याचं पहायला मिळालं.

 

News English Summary: Shiv Sena chief and Chief Minister Uddhav Thackeray had criticized Narayan Rane and his two children. After Uddhav Thackeray compared Narayan Rane to a frog, Rane’s son Nitesh Rane has retaliated against Uddhav Thackeray. “Have you given birth to a ‘Shravanbal’ who is abusing girls by getting drunk ?,” Thackeray has been asked.

News English Title: MLA Nitesh Rane Criticize CM Uddhav Thackeray Allegations On Aaditya Thackeray News Updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x