मुंबई : मागील ३ वर्षे पक्षाच्या सर्वच जाहीर कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवणारे एनसीपीएचे मराठवाड्यातील दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज मुंबईतील मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जयदत्त क्षीरसागर भेट घेणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे त्यांना शिवबंधन बांधतील. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय सुट्यानिमित्त परदेश दौऱ्यावर असल्याने हा प्रवेश लांबला होता.

दरम्यान राष्ट्रवादीत अन्यायझाल्याने आणि स्वाभिमान दुखावल्याने त्यावर स्वतः शरद पवारांशी चर्चा झाली होती. मात्र तरी देखील बीडमधील पक्षांतर्गत गटबाजीमुळे पक्ष सोडावा लागतोय, असे जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. तसेच, विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा देखील सोपविणार आहे. त्यानंतर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांचा आज शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश