21 October 2019 4:13 PM
अँप डाउनलोड

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मनोज कोटक यांची वर्णी लागण्याची शक्यता

Manoj Kotak, Ashish Shelar, Devendra Fadanvis

मुंबई : लोकसभेच्या निवडणुका झाल्याने आता निकालाची प्रतीक्षा असली तरी सर्वच पक्षांमध्ये फेरबदलाला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे बदल होणार असल्याचे संकेत आहेत. मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशीष शेलार यांची अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांच्या जागी नव्या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे आणि त्यात गुजराती चेहऱ्यालाच प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरपालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक यांची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. विद्यमान अध्यक्ष शेलार यांची दुसरी टर्म पुढच्या महिन्यात संपणार आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या घटनेनुसार एकाच व्यक्तीला तिस-यांदा अध्यक्षपद देता येणार नसल्याने आशिष शेलार यांच्या जागी पर्यायी नावांवर विचार करण्यात येत आहे.

मनोज कोटक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मनोज कोटक सध्याचे बीएमसीतले भाजपचे गटनेते आहेत. त्याचबरोबर ते भाजपचे ईशान्य मुंबईतले लोकसभा उमेदवारही आहेत. काहीसे शांत स्वभावाचे असलेले मनोज कोटक आगामी निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या टीकेला कसे सामोरे जाणार ते देखील प्रश्न चिन्हं आहे.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(10)#BJPMaharashtra(284)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या