27 July 2024 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
x

केसरकारांवर गाणं येणार बहुतेक, सभांसाठी राब राबतो! भाषणात झोपा काढतो!..शिंदेंच्या कंटाळवाण्या भाषणावेळी केसरकर, शंभूराजेंच्या डुलक्या

CM Eknath Shinde

Deepak Kesarkar | दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात राजकीय पडसाद उमटत असताना आता बीकेसीच्या मेळाव्यानंतर युवा सेनेने शिंदे गटावर आणखी एक आरोप केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या मोकळ्या जागेत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी व्यवस्था केली होती, त्या जागेत मद्यपान करून मोठ्या प्रमाणात बाटल्या फेकल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.

विद्यापीठाच्या आवारात अशा प्रकारे कचरा आणि दारुच्या बाटल्या फेकल्यानं आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ठाकरेंच्या युवा सेनेनं केली आहे. त्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अजूनही काही विषय समोर आल्याने शिंदे गटाच्या मेळाव्याचे हसू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री फक्त दोन-तीन तास झोपतात, असं विधान दीपक केसरकर यांनी नुकतंच केलं होतं. आता शिंदे हे खरोखरच असं करतात की नाही, या वादात आपण पडायला नको. पण यावर माहिती देणारे दीपक केसरकर मात्र १० च्या आधीच कुठेही झोपतात हे पाहायला मिळालं आहे. बीकेसीतील दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरु असताना दीपक केसरकर आणि शंभूराजे हे दोन्ही शिंदे समर्थक डुलक्याकडून झोपताना दिसले. त्याचे व्हिडिओ देखील माध्यमांवर समोर आले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde speech at BKC where Kesarkar was sleeping check details 06 October 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x