1 December 2022 10:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stock in Focus | या कंपनीचे शेअर्स तब्बल 74 टक्के स्वस्त झाले, इतका स्वस्त झालेला स्टॉक खरेदी करणार? Mutual Funds | अरे देवा! लोकं कार खरेदीपेक्षा म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत आहेत, SIP गुंतवणूक वाढीचे कारण काय? Surya Rashi Parivartan | या 3 राशीच्या लोकांनी 16 डिसेंबरपासूनचा काळ सांभाळून पार करावा, कोणत्या राशी पहा RBI e-Rupee | आरबीआय ई-रुपयासाठी इंटरनेट लागणार? सर्वसामान्यांना कसा फायदा होणार समजून घ्या EPF Pension Limit | खासगी नोकरदारांना आता 25000 रुपये पेन्शन मिळणार, तुमचे पैसे 333 टक्क्यांनी असे वाढणार पहा ITR Filling | तुमची यामार्गे सुद्धा कमाई होते का? इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते, टॅक्स भरावा लागणार Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा
x

PPF Scheme | या सरकारी योजनेतून देखील 1 कोटींचा हमी परतावा मिळेल, टॅक्स सवलत आणि बरंच काही मिळेल, योजनांबद्दल जाणून घ्या

PPF Scheme

PPF Scheme | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी जिला आपण PPF योजना म्हणूनही ओळखतो, ही सरकारद्वारे संचालित एक लोकप्रिय अल्पबचत योजना आहे. PPF योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडू शकता. PPF योजनेची कमाल मुदत 15 वर्षे निश्चित करण्यात आली आहे, म्हणजेच ही सरकारी योजना गुंतवणूकदारांना दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय देते. PPF योजना मुख्यतः नोकरी करणार्‍यांसाठी किंवा ठराविक मासिक उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी भविष्यात चांगला परतावा देऊ शकते. PPF योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांच्या नावानेही खाते उघडून गुंतवणूक करू शकता. मुलं प्रौढ झाल्यानंतर, ते स्वतः आपले PPF खाते ऑपरेट करू शकतील. या योजनेत मुलांच्या नावाने गुंतवणूक केल्यास तुमचे मूल प्रौढ होईपर्यंत चांगला निधी तयार झाला असेल. या पैशाचा वापर मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, किंवा लग्नात वापरता येऊ शकतो.

PPF खात्यात आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलत देखील दिली जाते. या योजनेत तुम्ही वार्षिक 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर सवलतीचा दावा करू शकता. PPF योजनेत मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम ही आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत पूर्णपणे करमुक्त असेल. तुम्ही जर तुमच्या मुलाच्या नावाने PPF खाते उघडले असेल तर तुम्हाला PPF खात्यावर कर्ज घेण्याची आणि अंशतः पैसे काढण्याचीही सुविधा दिली जाते.

योजना कालावधीत वाढ :
PPF योजनेत मॅच्युरिटीचा कालावधी 15 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. पण या योजनेत तुम्हाला कालावधी दर 5-5 वर्षांनी वाढवण्याचा पर्याय देण्यात आला आहे. PPF खात्यात गुंतवणूक करण्यासाठी वार्षिक किमान गुंतवणूक मर्यादा 500 रुपये आणि कमाल गुंतवणूक मर्यादा 1.50 लाख रुपये असेल. तुम्ही या योजनेत फक्त 500 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. एका वर्षात PPF खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता.

PPF रिटर्न कॅल्क्युलेटर :
* कमाल मासिक ठेव : 12,500 रुपये
* कमाल वार्षिक ठेव मर्यादा : 1,50,000 रुपये
* वार्षिक व्याजदर : 7.1 टक्के चक्रवाढ पद्धतीने
* 15 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम : 40,68,209 रुपये
* एकूण गुंतवणूक : 22,50,000 रुपये
* व्याज परतावा : 1800000 रुपये

योजनेची मुदत 5 वर्षांनी वाढवली तर :
* कमाल मासिक ठेव : 12,500 रुपये
* कमाल वार्षिक ठेव : 1,50,000 रुपये
* वार्षिक व्याजदर : 7.1 टक्के चक्रवाढ पद्धतीने
* 20 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम : 66.58 लाख रुपये
* वीस वर्षात होणारी एकूण गुंतवणूक : 30 लाख रुपये
* व्याज परतावा : 3580000 रुपये

योजनेची मुदत 10 वर्षांनी वाढवली तर :
* कमाल मासिक ठेव :12,500 रुपये
* कमाल वार्षिक ठेव : 1,50,000 रुपये
* वार्षिक व्याजदर : 7.1 टक्के चक्रवाढ पद्धतीने
* 25 वर्षानंतर मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम : 1.03 कोटी रुपये
* एकूण गुंतवणूक रक्कम : 37.50 लाख रुपये
* व्याज लाभ : 58 लाख रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF Scheme Investment benefits and returns on Investment on 06 October 2022.

हॅशटॅग्स

#PPF Investment(59)#PPF Scheme(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x