26 July 2021 4:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

स्टार्टअपला मार्गदर्शन, सल्ला, नेटवर्किंग आणि ओळखीची गरज: रतन टाटा

Ratan Tata, Start Up, Narayan Murthi

मुंबई:  माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मूर्ती यांची इन्फोसिस आणि टाटा समूहातील ‘टाटा कन्सल्टन्सी’ या दोन्ही कंपन्या एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. मात्र टाटा यांचा अनुभव आणि त्यांचे ज्ञान नेहमीच इतर उद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरले आहे. ८२ वर्षीय रतन टाटा यांना कॉर्पोरेटमध्ये आदराचे स्थान आहे. त्यामुळेच टाटा यांना पुरस्कार दिल्यानंतर मूर्ती आपसूकच त्यांच्यासमोर झुकले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. टाटा यांनीही मूर्ती यांना तशाच प्रकारे प्रतिसाद दिला. ते म्हणाले की नारायण मूर्तीसारख्या एका श्रेष्ठ मित्राकडून हा पुरस्कार मिळेल हे माझे भाग्य समजतो, अशी भावना टाटा यांनी व्यक्त केली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

टायकॉन पुरस्कार सोहळ्यात रतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते रतन टाटा यांना देण्यात आला. यावेळी पुरस्कार दिल्यानंतर नारायण मूर्ती रतन टाटांच्या पाया पडले आणि आशीर्वाद घेतला. नारायण मूर्ती आणि रतन टाटा यांच्यात वयाचं जास्त अंतर नाही. नारायण मूर्ती यांच्यात केवळ १० वर्षाचा फरक आहे.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना रतन टाटा यांनी उद्योगात नैतिकता जपली पाहिजे असं म्हटलं आहे. “आपल्याला असे स्टार्टअप मिळतील जे आपलं लक्ष आकर्षित करतील. नंतर ते पैसे जमा करतील आणि गायब होतील. अशा स्टार्टअपना दुसरी किंवा तिसरी संधी मिळणार नाही,” असा इशारा रतन टाटा यांनी यावेळी दिला.ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडीलमध्ये गुंतवणूक करणाऱ्या रतन टाटा यांनी उद्योगात नैतिकता जपली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. एका रात्रीत प्रसिद्ध होण्याच्या पद्धतींपासून सावध राहिलं पाहिजे. स्टार्टअपला मार्गदर्शन, सल्ला, नेटवर्किंग आणि ओळखीची गरज असते असं देखील रतन टाटा यांनी सांगितलं.

 

Web Title:  Industrialist Ratan Tata express his opinion about Indian Start up.

हॅशटॅग्स

#india(209)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x