18 June 2021 1:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार BHR घोटाळा | गिरीश महाजन समर्थकांवर काल कारवाई झाल्यानंतर नाथाभाऊंनी शरद पवारांची भेट घेतली रुग्नाला १ केळ द्यायला ढीगभर भाजप-RSS कार्यकर्ते उपक्रम | अन भातखळकरांची काँग्रेसच्या त्या उपक्रमावर टीका मुंबईकरांनो मुलांची काळजी घ्या | ब्लॅक फंगसमुळे ३ मुलांवर शस्त्रक्रिया | डोळे काढावे लागले अमेरिका | कोरोना लसीनंतर आता कोविड-19 च्या टॅबलेट तयार करणार | संशोधनासाठी 3 अब्ज डॉलर्सचा निधी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी खुशखबर | आता शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार BHR Scam | बडे मासे आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात | २ आमदारही तपास यंत्रणेच्या रडारवर?
x

वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार करुन मुनगंटीवारांनी ५०० कोटींचा बंगला बांधला: अमोल मिटकरी

BJP Leader Sudhir Mungantiwar, NCP Leader Amol Mitkari

मुंबई: महाराष्ट्रात शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळीकडून विविध मुद्यांवरून आरोप केले जात आहे. त्यात आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वृक्ष लागवडीत मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एनसीपीचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी हे आरोप केले आहे. ठाण्यातील एका जिमच्या उदघाट्न कार्यक्रमात ते बोलत होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अमोल मिटकरी म्हणाले, “सर्वात आधी सुधीर मुनगंटीवार यांच्या घराची चौकशी करायला हवी. ईडीची पहिली नोटीस त्यांनाच पाठवायला हवी. सुधीर मुनगंटीवार याचं घर तब्बल ५०० कोटी रुपयांचं आहे. मी स्वतः त्यांचा तो बंगला पाहिला. या बंगल्याच्या ५व्या मजल्यावर पार्किंग आहे. रोपट्यांना एसी आहे. कलर कॉम्बिनेशनसाठी किचनचीही खास जोडणी केली आहे. ३३ कोटी वृक्ष लागवडीतील इतका पैसा भ्रष्टाचार आहे. याची पाळंमुळं खोदली पाहिजे.”

अमोल मिटकरी यांच्या या आरोपानंतर आता राष्ट्रावादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये चांगलीच जुंपली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मागील काळात वारंवार महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका झाली आहे. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांकडूनही मुनगंटीवर यांना लक्ष्य केलं जात असल्याचं बोललं जात आहे.

 

Web Title:  Corruption allegations of NCP Leader Amol Mitkari on BJP Leader Sudhir Mungantiwar.

हॅशटॅग्स

#Sudhir Mungantiwar(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x