मुंबई : मुंबईमधील बीकेसीतील महामेळाव्यात नितीन गडकरी यांनी जनधन योजनेअंतर्गत ३१ कोटी बँक खाती उघडल्याचे भाषणादरम्यान सांगितले खरे, परंतु जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या ३१ कोटी बँक खात्यांपैकी २० टक्के म्हणजे तब्बल ६ कोटी बँक खाती निष्क्रिय ठरली आहेत हे सांगायला ते विसरले.

होय हि आकडेवारी स्वतः केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी शिवप्रताप शुक्ला यांनी राज्यसभेत लिखित स्वरूपात दिली होती. त्यांनी दिलेल्या महिनीनुसार भारत सरकारने जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या ३१ कोटी बँक खात्यांपैकी २० टक्के म्हणजे तब्बल ६ कोटी बँक खाती निष्क्रिय ठरली आहेत.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०१८ पर्यंत उघडण्यात आलेल्या खात्यांपैकी २५.१८ कोटी खात्यांमध्ये देवाणघेवाण होणारे व्यवहार सुरु आहेत आणि पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत खोलण्यात आलेली तब्बल ६ कोटीहून अधिक खाती निष्क्रिय ठरली आहेत.

पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत ह्या फेब्रुवारीपर्यंत उघडलेल्या एकूण खात्यांपैकी तब्बल ५९ लाख बँक खाती बंद करण्यात आली आहेत. ती जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेली खाती खातेदारकाच्या विनंती वरूनच बंद करण्यात आल्याची माहिती अर्थराज्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिली आहे. १५ ऑगस्ट २०१४ मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती तर सुरुवात ही २८ ऑगस्ट २०१४ मध्ये करण्यात आली होती.

एकूणच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी जनधन योजनेची ही बाजू भाषणादरम्यान शिस्तबद्ध टाळल्याचे दिसले. ज्यामुळे जनधन योजनेचा बोजबारा उडाला आहे हे सिद्ध होत.

Nitin gadkari on Janadhan Yojana at Mumbai BKC Speech