18 April 2024 9:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

पंढरपूर-मंगळवेढा | पोटनिवडणूकीच्या मतदानाला सुरुवात

Pandharpur Mangalvedha

पंढरपूर, १७ एप्रिल: मागील अनेक दिवसांपासून ज्या निवडणूकीची जय्यत तयारी, सभा सुरू होत्या तो दिवस आज (१७ एप्रिल) आला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू झाले आहे. या निवडणूकीत राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली असून भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे हे मतदान १२ तासांचे असणार आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच काल ईव्हीएम मशिनसह इतर आवश्यक सर्व साहित्य मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. पण जमावबंदीचे आदेश लागू राहणार आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान हे १२ तास केले जाणार आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित अथवा चुकीचा प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ७ वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्त असणार आहे. संवेदनशील असणाऱ्या १६ मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी स्थानिक पोलीस, होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या असा अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

News English Summary: Today (April 17) is the day for which the election preparations and rallies have been going on for the last several days. Voting for the Pandharpur-Mangalvedha Assembly by-election has started today. In this election, Bhagirath Bhalke, son of late MLA Bharat Bhalke has been nominated by NCP and Samadhan Avtade has been nominated by BJP.

News English Title: Pandharpur Mangalvedha assembly by poll election voting today news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x