माझ्याकडे घर ना दार म्हणणाऱ्या अमृता फडणवीस यांची मालमत्ता पहा किती कोटीची
मुंबई, १५ ऑक्टोबर : मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वावरून लिहलेले पत्र आणि त्या पत्राला ठाकरेंनी दिलेले उत्तर यामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.
त्यांच्या या टीकेला शिवसेना नेत्या विशाखा राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विशाखा राऊत म्हणाल्या कि, अमृता फडणवीस या काही भाजपच्या प्रवक्त्या नाही. त्या फक्त माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी आहेत. जर त्या भाजपच्या नेत्या किंवा नगरसेवक सुद्धा असत्या तर आम्ही ऐकले असते. पण, अमृता फडणवीस यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही तोंड उघडले तर तुम्हाला तोंड लपवायला जागा ठेवणार नाही, अशा शब्दात त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. याच शिवसेनेवर अमृता फडणवीस यांनी बुल्डोजर सरकार म्हणत पलटवार केला आहे.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस
“माझ्याकडे ना घर आहे, ना दार. मग बुल्डोजर सरकार काय पाडणार?,” अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व शिवसेनेतील कलगीतुरा सुरूच आहे.
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये दक्षिण-पश्चिम नागपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती जाहीर केली होती. त्यात पत्नी अमृता फडणवीस यांच्या स्थावर मालमत्तेचे मूल्य २०१४ च्या ४२.६० लाख रुपयांवरून आता २०१९मध्ये ९९.३ लाख रूपये इतके झाले असल्याचा दावा करण्यात आला होता. ‘स्थावर मालमत्ता’ म्हणजे अचल मालमत्ता असते. उदा: जमीनजुमला, शेतीभाती, वाडी, फळबागा, इमारत, सोसायटीमधला फ्लॅट (गाळा) वगैरे यापैकी कशाचाही समावेश असू शकतो.
अमृता फडणवीस यांच्याकडे २०१४मध्ये रोख रक्कम २० हजार रूपये होती. २०१९ मध्ये १२५०० रुपयांची रोख रक्कम असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. बँकेतील ठेवी १,००,८८१ रुपये इतक्या होत्या. त्या २०१९ मध्ये ३, ३७, ०२५ रुपये इतक्या होत्या. त्यांच्याही वेतनात मागील पाच वर्षांत झालेल्या वाढीमुळे ही रक्कम वाढली असल्याचे म्हटले जात होते. अमृता यांच्या २०१४ मधील १.६६ कोटी रुपयांच्या शेअर्सचे मूल्य २०१९ मध्ये २.३३ कोटी रुपये इतके झाले आहे.
News English Summary: Amrita Fadnavis should not teach us. “If we open our mouths, we will not leave room for you to hide your face,” he said, criticizing Amrita Fadnavis. Amrita Fadnavis has retaliated against this Shiv Sena by calling it a bulldozer government.
News English Title: Amruta Fadnavis property mentioned in affidavit given by Devendra Fadnavis News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा