22 October 2021 11:56 AM
अँप डाउनलोड

अनंत गीतेंचे राष्ट्रवादी संदर्भातील 'ते' वक्तव्य वैफल्याग्रस्तातून | सुनील तटकरेंचे प्रत्यूत्तर

MP Sunil Tatkare

मुंबई, २१ सप्टेंबर | काल शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यांवर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैफल्याग्रस्तातून अनंत गीते यांचे वक्तव्या आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजपाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनंत गीतेचा स्वाभिमान मागच्या निवडणूनक गळून पडला असून नैराशेतून त्यांचे हे वक्तव्य आले असल्याचेही तटकरे म्हणाले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अनंत गीतेंचे राष्ट्रवादी संदर्भातील ‘ते’ वक्तव्य वैफल्याग्रस्तातून, सुनील तटकरेंचे प्रत्यूत्तर – NCP MP Sunil Tatkare replay to Shvsena leader Anant Gite over statement against Sharad Pawar :

सहन करता येत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अनंत गीतेंची अवस्था आहे. गितेंना समज द्यावी का, हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

अनंत गीते नेमकं काय म्हणाले होते?
श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी जाहीर बोलताना, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत भाष्य केलं. मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपलं गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.

दोन्ही काँग्रेस हे कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मतं नव्हती. दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत , मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असं अनंत गीते म्हणाले.

कोणीही कुठलाही नेता जगाने त्याला कितीही उपाध्या देवो, जाणता राजा बोलो. तो आमचा गुरु होऊ शकत नाही. आमचा गुरु फक्त बाळासाहेब ठाकरेच. आघाडीचे नेते आघाडी सांभाळतील आपल्याला ग्रामपचांयत, पचांयत समिती, जिल्हा परिषद सांभाळायची आहे, असं अनंत गीते म्हणाले. उद्या आघाडी तुटलीच तर आपण सुनील तटकरेंकडे जायचे का, आपण आपल्याच घरी येणार. म्हणून आपल्याला आपला पक्ष बळकट करायचा आहे, आघाडी नाही, असंही अनंत गीतेंनी नमूद केलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: NCP MP Sunil Tatkare replay to Shvsena leader Anant Gite over statement against Sharad Pawar.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x