गेल्या १० वर्षात सोमय्यांचं थोबाड पाहिलं नाही | मी कशाला सरकार पाडू? - रामदास कदम
मुंबई, २१ सप्टेंबर | परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधातील दारुगोळा शिवसेना नेते रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरविल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. खेडेकर यांच्या या आरोपांवर रामदास कदम यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. खेडेकर यांचे आरोप बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असं सांगतानाच गेल्या दहा वर्षात मी सोमय्यांचं थोबाडच पाहिलं नसल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
गेल्या १० वर्षात सोमय्यांचं थोबाड पाहिलं नाही, मी कशाला सरकार पाडू? – Shivsena leader Ramdas Kadam gave clarifications over allegation from MNS leader Vaibhav Khedekar :
रामदास कदम यांनी मीडियाशी बोलताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. रत्नागिरी परिषदेतील खेडचे क वर्ग नगरपालिकेतील नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची पुष्कळशी प्रकरणं मी माहितीच्या अधिकारातून काढली. आमच्या नऊ नगरसेवकांनी त्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला. जिल्ह्याधिकाऱ्यांनी सर्व प्रस्तावाची शहानिशा केली, सुनावणी घेतली आणि हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. खेडेकर हे कोर्टात गेले होते. न्यायालयामधून त्यांनी चार आठवड्याची स्थिगिती घेतली. त्यानंतर ते प्रचंड बिथरले. त्यांनी माझ्यावर निखालस खोटे, चुकीचे आणि दिशाभूल करणारे आरोप केले, असा दावा कदम यांनी केला आहे.
अनिल परब यांचा जो रिसॉर्ट आहे. त्याची तक्रार किरीट सोमय्यांकडे मी केली, असं खेडेकर यांचं म्हणणं आहे. खेडेकरांचं हे म्हणणं हस्यास्पद आहे. गेल्या दहा वर्षात मी सोमय्यांचं थोबाड पाहिलं नाही. भेटणं तर लांबच झालं. सोमय्यांना टीव्हीवर कधी तरी पाहतो. मी समोरून अंगावर जाणारा माणूस आहे. मी कधी कुणाच्या पाठित खंजीर खुपसला नाही हे सर्व महाराष्ट्र जाणून आहे. मी अनिल परबच्या हॉटेलची तक्रार का करणार? तसं केल्यानं काय साध्य होणार आहे? अनिल परब हे माझ्या पक्षाचे मंत्री आहेत. याचं मला भान आहे. मी कडवा शिवसैनिक आहे, असं त्यांनी सांगितलं.
सरकार पाडणं म्हणजे मी माझ्या पायावर धोंडा मारून घेणं:
रामदास कदम सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा बिनबुडाचा आरोपही खेडेकर यांनी केला. संपूर्ण महाराष्ट्र रामदास कदमला ओळखतो. रामदास कदम हा कडवा सैनिक आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे. एक गोष्ट पुन्हा सांगतो. विधानसभेच्या निवडणुकीत मीच पत्रकार परिषद घेऊन यापुढे कोणतंही पद घेणार नाही, अशी घोषणा केली होती. तेव्हा मंत्रीपद मिळण्याचा प्रश्नच येत नाही. नाराज असण्याचाही प्रश्नच नाही. मीच कोणतंही पद घेणार नसल्याचं सर्वात आधी सांगितलं होतं. त्यामुळे नाराजीचा प्रश्न येतो कुठे? तसं असतं तर मी इथे आलोच नसतो, असं सांगतानाच सरकार पाडणं म्हणजे मी माझ्या पायावर धोंडा मारून घेणं एवढं मला कळतं ना. सरकार पडलं तर नुकसान माझं होईल. मी कशाला सरकार पाडू असं मत त्यांनी व्यक्त केलं.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: Shivsena leader Ramdas Kadam gave clarifications over allegation from MNS leader Vaibhav Khedekar.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News