Mumbai Potholes | मुंबई भाजपाच्या आंदोलनाची संपूर्ण पोलखोल | पूर्वनियोजित होती पोलिसांची बदनामी करण्याची योजना
मुंबई , ०२ ऑक्टोबर | मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येतं आहे तसं मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून (Mumbai Potholes) सत्ताधारी शिवसेनेला लक्ष केलं आहे. त्याच अनुषंगाने मुंबई भाजपच्या युवा मोर्चाने आज मुंबई अंधेरी पूर्व येथील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आंदोलन करून मुंबई महानगरपालिकेला लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र या आंदोलनासाठी मुंबई भाजपने कोणतीही पूर्व परवानगी घेतली नव्हती.
Mumbai Potholes. ‘Won’t tolerate such police atrocities’ Devendra Fadnavis and Ashish Shelar condemn lathicharge on BJYM activists protesting against potholes :
आंदोलन जरी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात असलं कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आंदोलन पोलीस यंत्रणेलाच हाताळावं लागत आणि त्यात महापालिकेचा कोणताही सहभाग नसतो. परिणामी, मुंबई पोलिस कायदेशीर कारवाई करणार हे माहित असल्याने भाजपच्या संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक सुनियोजित कट आखला असंच म्हणावं लागेल. विशेष म्हणजे भाजपाच्या खोट्या रणनीतीप्रमाणे यामध्ये राज्यातील सर्वच म्हणजे फडणवीस, चंद्रकांतदादा ते संबंधित पदाधिकारी सर्वच जण सामील झाल्याचं दिसतंय.
एकूण संबंधित भाजप पदाधिकाऱ्याने रचलेला सुनियोजित प्लान हा स्वतःची राजकीय प्रतिमा मोठी करण्यासाठी असावा आणि त्यासाठी पक्षातील वरिष्ठांना खोटी आणि चुकीची माहिती दिली असं म्हणावं लागेल. आंदोलनाच्या ठिकाणी जे घडलंच नाही ते सुनियोजित (स्क्रिप्टेड) करून मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी एक खोटी स्टोरी रचून पुन्हा राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी एक विचित्र सुनियोजित आंदोलन केल्याचं आता खाली पुराव्यानिशी स्टेप बाय स्टेप देतं आहोत. आमच्या प्रतिनिधीने दिलेली सर्व माहित, पण त्यात पहिल्यांदा फोटो पाहू आणि शेवटी व्हिडिओ ज्यामध्ये सुनियोजित आंदोलनाची आणि संबंधित पदकधीकार्याची पोलखोल होईल.
१. आंदोलन झालं तिथे नेमकं काय घडलं:
ठरल्याप्रमाणे भाजपचे युवा पदाधिकारी आणि कार्यकर्ते अंधेरी पूर्वेकडील खड्डे असलेल्या रस्त्यावर आंदोलनासाठी जमले ज्यासाठी कोणतीही पूर्व परवानगी घेतलेली नव्हती. खबरदारीचा उपाय म्हणून आंदोलनाच्या ठिकाणी म्हणजे रोड क्रमांक ११ येथे पोलीस (MIDC पोलीस स्टेशन) उपस्थित होते आणि भाजपचे युवा पदाधिकारी आणि कार्यकर्ते संबंधित ठिकाणी जमल्यावर राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु झाली आणि अधिक विलंब न करता काही क्षणातच भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी संबधित खड्डे असलेल्या रस्त्यावर हातात निदर्शनाचे बोर्ड घेऊन झापले. त्यात खड्डे असलेल्या रस्त्यावर झोपल्याने ट्राफिक वर्दळ पूर्णपणे थांबली. त्यानंतर पोलीस थोडे पुढे सरकले पण कार्यवाही केली नाही. पोलीस जवळ आल्याने कार्यकर्ते एकमेकांना रस्त्यावर एकमेकांना खेटून झोपले तसेच पोलीस रस्ता खाली करण्यासाठी आंदोलकांना ताब्यात घेणार असं वाटताच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची खड्डे असलेल्या रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेतच आपसात रेटारेटी झाली आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचे हात उभे असलेल्या कार्यकर्त्यांनी घट्ट पकडण्यास सुरुवात केली. आणि परिणामी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आणि हातावर रॅशेस पडले.
त्यानंतर वाहतूक कोंडी अजून वाढू लागल्याने पोलीस आंदोलक कार्यकर्त्यांच्या जवळ येऊन उभे राहिले. त्यानंतर काही मिनिटातच पोलिसांनी वाहतुकीचा रस्ता अडवल्याने कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आणि त्यात रेटारेटी आणि घॊषणाबाजी झाली आणि त्यात पोलिसांनाच अधिक धक्काबुक्की करण्यात आली (त्याचे फोटो पुरावे आहेत, पण योग्य वेळी म्हणजे भाजप पुढे काय करणार ते पाहून पुरावे देऊ). आंदोलकांना पोलिसांनी एकाबाजूने हात आणि दुसऱ्या बाजूने पाय धरून सुरक्षितपणे पोलीस वाहनात भरताना दोन्ही बाजूने खेचाखेची झाली आणि अचानक भाजप कार्यकर्त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्याचा हात सोडल्याने ते जमिनीवर आपटले आणि त्याच्या पाठीला थोडं खरचटलं आणि उजव्या हाताला थोडं चिरल्या सारखं झालं, त्याला कारणीभूत खेचाखेचीत झटकन हात सोडणारे भाजप कार्यकर्ते होते. (या लेखाच्या सर्वात खालील व्हिडिओत पाहू शकता, ०१.०५ व्या सेकंदापासून ते १.१४ व्या सेकंदापर्यंत). मात्र, कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झाला नाही किंवा ती वेळच पोलिसांवर आली नाही. पोलीस संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन पोलीस स्थानकात गेले.
२. संबंधित आंदोलक पदाधिकाऱ्याकडून वरिष्ठांना प्लानप्रमाणे ‘स्क्रिप्टेड’ माहिती:
आंदोलक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर आंदोलकांनी ठरवल्याप्रमाणे वरिष्ठांना लाठीचार्ज आणि पदाधिकाऱ्यांना अमानुष मारहाण झाल्याची ‘धादांत खोटी’ माहिती देण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर भाजपचा इतिहास असल्या प्रमाणे समाज माध्यमांवर एक अभियान सुरु करून धूळफेक करण्यास सुरुवात झाली आहे. अगदी ‘अमानुष’ शब्द पॉलिटिकली कॅश करण्यासाठी संबंधित पदाधिकारी नंतर इस्पितळात दाखल झाले. त्यानंतर फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, अतुल भातखळकर, निलेश राणे, नितेश राणे (नितेश राणेंनी लाठीचार्जचा दावा केलेला नाही) यांनी त्यावर थेट लाठीचार्जचे खोटे ट्विट करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे एकानेही लाठीचार्ज केल्याचा व्हिडिओ असं काही शेअर केलेलं नाही. पण मुंबई पोलिसांविरोधात थेट पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात झाली आहे.
We strongly condemn & protest against lathicharge on our peaceful BJYMactivists, who were agitating against potholes at Andheri,#Mumbai.
We will not keep quiet & won’t tolerate such police atrocities;will do stronger agitation.
15 BJYM Karyakartas got injured in this lathicharge! pic.twitter.com/pdiIxYuMVL— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 2, 2021
मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांवर सत्ताबळ वापरून केलेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध ! या घटनेत १५ भाजयुमो कार्यकर्ते जखमी झाले आहेत. हे हुकूमशाही सरकार आमचा आवाज दाबण्याचा जितका प्रयत्न करेल तितकाच आमचा आवाज बुलंद होत जाईल. pic.twitter.com/vJAhapR3uA
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 2, 2021
मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष तजिंदार तिवाना च्या वतीने मुंबई खड्डे विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलनाला मुंबई पोलीसांकडून लाठीचार करत आवाज दाबणाऱ्या ठाकरे सरकारचा जाहीर निषेध!!! pic.twitter.com/HgQOD1Du3v
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 2, 2021
भाजपाने आज मुंबईत केलेले खड्डे विरोधी आंदोलन पोलिस बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न झाला.
पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज देखील केला आहे.
शांततेने आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या मुर्दाड ठाकरे सरकारचा धिक्कार.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 2, 2021
आताच जी.टी.रुग्णालयात भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष @TajinderTiwana आणि अन्य पदाधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच डॉक्टरांशी देखील चर्चा केली. इतकी अमानुष मारहाण केल्या करण्यात आली आहे हे खेदजनक आहे, त्या पोलीस अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी! https://t.co/GK908P6lL5 pic.twitter.com/XT31L9tmc4
— Prasad Lad (@PrasadLadInd) October 2, 2021
This is how Yuva morcha mumbai president n party workers r treated if they raise their voice against the bad roads in Mumbai!!!
Everyone who fights against this corrupt @mybmc is silenced!!
“Shivsena Mukt Mumbai” is the only answer !! @BJP4Mumbai pic.twitter.com/aXD9pz3sgQ— nitesh rane (@NiteshNRane) October 2, 2021
कोई भी जुल्मों सितम हमको रोक ना पाएगा
मुंबई की जनता के हक़ों के लिए हर हद को तोड़ा जाएगा I pic.twitter.com/jmZlFB49SE— Tajinder Singh Tiwana (@TajinderTiwana) October 2, 2021
३. ताजींदर सिंग तिवानाने पोलिसांविरोधात आधीच रचली होती खोटी ‘स्क्रिप्ट’: (त्यांची पोलखोल शेवटी व्हिडिओमध्ये दिसेल)
भाजप मुंबई युवामोर्चाचे अध्यक्ष ताजींदर सिंग तिवाना यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वीच रस्त्यावर झोपल्यावर अनेकदा कार्यकर्त्यांची रेटारेटी झाल्याने चेहऱ्यावर आणि हातावर रॅशेस पडले होते. त्यालाच त्यांनी पोलिसांनी लाठीचार्ज आणि मारहाण झाल्याचं भासवलं. त्यासाठी खालील हे दोन फोटो पहा (हात उजवा). आंदोलकांना पोलिस उचलून पोलीस वाहनात बसवण्यासाठी घेऊन जात असताना दुसऱ्या बाजूने अनेक भाजप कार्यकर्त्यांनी जोर लावून संबंधित पदाधिकाऱ्यांचे हात ओढण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूने पोलिसांनी जोर लावताच अचानक भाजप कार्यकर्त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्याचे हात सोडल्याने तो जमिनीवर आपटले आणि त्याच्या पाठीला खरचटलं आणि उजव्या हाताला थोडं चिरल्या सारखं झालं, त्याला कारणीभूत खेचाखेचीत झटकन हात सोडणारे भाजप कार्यकर्ते होते. (या लेखाच्या सर्वात खालील व्हिडिओत पाहू शकता, ०१.०५ व्या सेकंदापासून ते १.१४ व्या सेकंदापर्यंत)
आता हा फोटो पहा…. रस्त्यावर झोपल्यावर झालेल्या रेटारेटीत संबधित पदाधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर जे रॅशेस उठले तेच त्यांनी इस्पितळात आमदार प्रसाद लाड यांना दाखवत पक्षासाठी किती यातना झेलल्या त्याचा पाढा वाचला आणि आमदार प्रसाद लाड यांनी पोलिसांनी न केलेल्या कृत्यावरून संबंधित पोलिसांना थेट निलंबित करा, अन्यथा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढू अशी धमकीच दिली.
आता त्याच पदाधिकाऱ्याचा खाली फोटोमध्ये डावा हात पहा, त्याआधारे त्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेताना मारहाण आणि लाठीचार्ज केल्याने टीशर्ट फाटल्याचा आरोप केला आहे. म्हणजे पोलिसांनी हात लावण्यापूर्वी टीशर्ट अर्थातच डाव्या हाताला फाटलेला नसणार… बरोबर?
भाजप आ. आशिष शेलारांच्या व्हिडिओत पदाधिकाऱ्याची पोलखोल: (टीशर्ट आधीच फाडून ठेवलेलं)
हेच आंदोलन सुरु असतानाचा २ मिनिट १६ सेकंदाचा व्हिडिओ भाजपचे मुंबईतील आमदार आशिष शेलार यांनी शेअर केला. याच व्हिडिओच्या २१ व्या सेकंद पर्यंत आंदोलक रस्त्यावर झोपून घोषणाबाजी करताना दिसत आहेत. आणि व्हिडिओच्या २२ व्या सेकंदाला पोलीस पुढे येऊन संबधित पदाधिकाऱ्याला पहिल्यांदा उजव्या हाताला धरून वर उठवताना दिसत आहेत. त्यानंतर ३६ व्या सेकंदाला संबंधित पदाधिकारी स्वतःचा डावा हात (टीशर्ट फाटलेली बाजू) पुढे करून पोलिसांवर आरोप करताना दिसतोय.
म्हणजे पुराव्यानुसार पोलीस २२ व्या सेकंदाला कारवाईसाठी पुढे आले आणि २३ व्या सेकंदाला संबंधित पदाधिकाऱ्याला स्पर्श केला. याचा अर्थ कमीत कमी २३-२५ सेकंदापर्यंत पदाधिकाऱ्याचा टीशर्ट व्यास्थित होता असं समजू. आता याच व्हिडिओमध्ये त्यापूर्वीचा पार्ट व्यवस्थित निरखून पहा… म्हणजे व्हिडिओतील सुरुवातीचा ०.०१ सेकंदापासून ते ०.०६ सेकंदापर्यंत उभी असलेले एक पत्रकार वारंवार ‘ये फ्लेक्स हटा, ये फ्लेक्स हटा’ असं वारंवार संबंधित पदाधिकाऱ्याकडे पाहून बोलत आहे, पण संबंधित पदाधिकाऱ्याने त्याच्या टीशर्टचा डावा हात आधीच फाडून ठेवल्याने (पोलिसांनी हात लावण्यापूर्वी) तो फ्लेक्समागे हात लपवत होता. तो फाटलेला टीशर्ट ०.०१ सेकंदापासून ते ०.०६ सेकंदादरम्यान तुम्ही पाहू शकता जेव्हा त्याच्या हातातील फ्लेक्स काही सेकंदासाठी बाजूला झाला होता.
मा. @CMOMaharashtra मुख्यमंत्री महोदय, जनतेच्या प्रश्नांवर लोकशाही मार्गाने अंहिसेच्या आंदोलनाला पोलीसांकडून असेच चिरडणार असाल तर यापुढे मंत्रालयात लाठ्याकाठ्या घेऊन आंदोलने करायची का? @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Mumbai pic.twitter.com/SJZzz5Y1nf
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 2, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Mumbai potholes BJP agitation against BMC fact check scripted plan against Mumbai Police.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या