कोरोना आपत्तीत जीव गमावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत
ठाणे, ७ नोव्हेंबर: महाविकास आघाडी सरकार पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तसेच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यात कर्तव्यावर असताना कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून आर्थिक मदत देण्यात आली. कोरोना आपत्तीच्या संकटकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या काही पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे अशा खऱ्या कोविड योध्याच्या कुटुंबियांना डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून आर्थिक मदतीचे धनादेश राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयातील दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या तसेच नातेवाईक उपस्थित नसलेल्या पत्रकार बांधवांचे चेक पत्रकार संघटनाच्या प्रतिनिधींकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार स्व.जयंत करजवकर, News 18 लोकमतच्या मुंबई कार्यालयात काम करणारे पत्रकार स्व.विठ्ठल मांजरेकर, तसेच संभाजीनगर येथील सामनाचे पत्रकार स्व. राहुल डोलारे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली.
#कोरोना साथीच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले. या #कोविड_योध्दा यांच्या कुटुंबियांना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून आर्थिक मदत करण्यात आली. pic.twitter.com/JAmEasOWN4
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 5, 2020
यावेळी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री दिलीप सपाटे, उपाध्यक्ष श्री दीपक भातुसे, माजी कार्यवाह श्री प्रमोद डोईफोडे, श्री सोनू श्रीवास्तव तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी श्री मयुरेश गणपते, श्री राजू सोनवणे आदि उपस्थित होते.
News English Summary: Shiv Sena leader and Urban Development Minister Eknath Shinde stated that the Mahavikas Aghadi government stands firmly behind the journalists. The families of the journalists who died due to corona while on duty in the state were informed by Dr. Financial assistance was provided by Shrikant Shinde Foundation. Some of the journalists who risked their lives during the Corona disaster had to lose their lives. Therefore, a check for financial assistance from the Dr. Shrikant Shinde Foundation was handed over to the families of such true Covid warriors by the Urban Development Minister of the State and the Guardian Minister of Thane, Eknath Shinde.
News English Title: Mahavikas Aghadi government stands firmly behind the journalists said minister Eknath Shinde News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट