15 August 2022 9:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Financial Tips | आर्थिक स्वातंत्र्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंतांपासून होईल सुटका Numerology Horoscope | मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Old Salary Account | तुमच्या जुन्या सॅलरी अकाउंटमुळे तुम्हाला हे 5 नुकसान होतात, अशाप्रकारे लवकर बंद करा Ola S1 e-Scooter | ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, 141 किमी रेंजचा दावा, किंमतीसह सर्व माहिती जाणून घ्या Horoscope Today | 16 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Utsav Deposit Scheme | एसबीआयने सुरु केली उत्सव फिक्स्ड डिपॉझिट योजना, जाणून घ्या योजनेचे फायदे Gold Bond Scheme | तुम्हाला स्वस्त सोनं खरेदीची संधी मिळणार, जाणून घ्या कधीपर्यंत गुंतवणूक करू शकाल
x

Benefits of Sugarcane Juice | आरोग्य आणि त्वचेसाठी उसाचा रस आहे गुणकारी

Benefits of Sugarcane Juice

मुंबई, २४ ऑगस्ट | भारत हा ऊस उत्पादन घेण्यात जगातील सर्वात मोठा देश आहे. उसाचे प्रमुख उत्पादन उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू,आंध्र प्रदेशमध्ये होते. उन्हाळ्याच्या दिवसांत उसाचा रस शीत पेय म्हणून पिल्या जाते. उसाचा रस केवळ स्वादिष्ट नसून आरोग्यासाठी लाभदायी आहे. चला तर मग जाणून घेऊया उसाच्या रसाचे फायदे.

आरोग्य आणि त्वचेसाठी उसाचा रस आहे गुणकारी – Benefits of Sugarcane Juice in Marathi :

शरीराची ऊर्जा वाढवतो:
उसाचा रस पिल्याने आपल्या शरीराचा थकवा दूर होर होतो. उन्हाळ्याच्या दिवसात उसाच्या रसाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. तसेच आपल्या शरीराला डिहायड्रेशनपासून दूर ठेवतो.

मूत्रपिंडाचे आरोग्य चांगले राहते:
उसाच्या रसात पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. यामुळे कावीळ, मूत्रपिंडाशी संबंधित आजारावर उसाचा रस गुणकारी आहे. उसाच्या रसामुळे इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखण्यास मदत मिळते. तसेच उसाच्या रसामुळे किडनीचे आरोग्य चांगले राहते. यामुळे उसाच्या रसाचे सेवन नक्की करावे.

कर्करोगाशी लढण्यास मदत:
उसाचा रस कर्करोगाशी लढण्यास मदत करते. कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह यासारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळेच शरीरात कर्करोगाशी लढण्यास मदत मिळते. तसेच ज्या व्यक्तीला स्तनाचा कर्करोग असेल त्यांच्यासाठी सुद्धा उसाचा रस गुणकारी आहे.

Health benefits of Sugarcane Juice :

चेहऱ्यावरील पुरळ कमी होतात:
उसाचा रस पिल्याने चेहऱ्यावरील समस्यां दूर होण्यास मदत मिळते. यामध्ये ग्लायकोलिक, अल्फा-हायड्रॉक्सीसारख्या अॅसिड सिडचे प्रमाण भरपूर असते. यामुळे शरीरात पेशींची वाढ होते. तसेच त्वचेला एक्सफोलिएट करून त्वचेवरील पुरळ कमी करण्यासाठी मदत करते. तसेच ऊस खाल्ल्याने दात मजबूत राहून दात किडण्याची शक्यता कमी असते.

पचनशक्ती चांगली राहते:
उसाच्या रसात पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आपल्या पोटातील पीएचची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते. तसेच आपल्या शरीराची पचनशक्ती चांगली ठेवल्यास मदत करते. उसाच्या रसामुळे पोटाच्या आजारांपासून बचाव होतो. यामुळे उसाचा रस आरोग्यासाठी लाभदायी आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Benefits of Sugarcane Juice in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x