19 August 2019 3:28 AM
अँप डाउनलोड

ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड कालवश

ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड कालवश

बंगळुरू : ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचं सोमवारी सकाळी बंगळुरू येथील त्यांंच्या राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. गिरीश कर्नाड यांच्या निधनामुळे कलाविश्वाचा आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. हिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे.

१९ मे १९३८ रोजी महाराष्ट्रातील माथेरान येथे गिरीश कर्नाड यांचा जन्म झाला होता. मराठी, हिंदी आणि कन्नड भाषांवर त्यांचे प्रभत्व होते. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ‘कार्नाड’ हे त्यांचं मूळ गाव. पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण पार पडलं. तर, महाविद्यालयीन शिक्षण धारवाडच्या कर्नाटक कॉलेजात झालं. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी विद्यापीठात अव्वल क्रमांक पटकवला होता. पुढे त्यांनी प्रतिष्ठित अशी ऱ्होडस शिष्यवृत्ती मिळवून ऑक्स्फर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांत १९६३ मध्ये त्यांनी एम.ए. केले. त्यानंतर तिथेच ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये काही काळ काम केल्यावर त्यांच्या मद्रास येथील कचेरीत ते काम करू लागले होते.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#india(58)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या