1 December 2022 8:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ITR Filling | तुमची यामार्गे सुद्धा कमाई होते का? इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते, टॅक्स भरावा लागणार Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा Money From IPO | हा IPO दुसऱ्या दिवशी 6 पट सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयांचा प्रीमियम, मोठ्या कमाईचे संकेत Equity Mutual Fund | इक्विटी फंडात पैसे गुंतवता? चांगले फंड कसे निवडावे आणि खराब फंडमधून कधी बाहेर पडावे? जाणून घ्या Talathi Bharti 2022 | राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती, त्वरित ऑनलाइन अर्ज करा PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 पदांची भरती, पटापट अर्ज करा Penny Stock | अपना सपना मणी मणी! या पेनी शेअरने 50 हजारावर 5 लाख परतावा दिला, अजून 35 टक्के वाढणार, नोट करा
x

Bigg Boss 16 | 'बिग बॉस 16' मध्ये दिसणार गोरी नागोरी, भाईजान आणि गोरी नागोरीचा व्हिडीओ आला समोर

Bigg Boss 16 New Promo

Bigg Boss 16 | ‘बिग बॉस 16’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेले 15 सीझन या शोने प्रेक्षकांच्या मनोरंजनामध्ये कोणतीही कसूर केलेली नाही दरम्यान, या वर्षीच्या सीझनमध्ये काही नियम बदलण्यात आले आहेत. त्यातील सर्वांत महत्वाचा निर्णय म्हणजे, या वर्षी स्पर्धकांसोबत बीग बॉस गेम खेळणार आहेत. त्यामुळे हा सीझन खूपच रंजक असणार आहे. ‘बिग बॉस 16’ सुरु होण्यासाठी काही तासच बाकी आहेत. स्पर्धक घरामध्ये बंद आहेत आणि प्रीमियर एपिसोड 1 ऑक्टोबर रोजी म्हणजेच शनिवारी रात्री 9.30 वाजता कलर्स टीव्हीवर दाखवण्यात येणार आहे. त्याच वेळी, आता शोचा एक नवीन प्रोमो देखील शेअर करण्यात आला आहे, या सीझनमध्ये राजस्थानची शकीरा गोरी नागोरी देखील सहभागी होणार असल्याची पुष्टी केली आहे तर ताज्या प्रोमोमध्ये गोरी सलमान खानसोबत मस्ती करताना आणि डान्स करताना दिसून येत आहे.

भाईजानची गोरी सोबत मस्ती
शोच्या नवीन प्रोमोमध्ये सलमान खान डान्सर गोरी नागोरीच्या स्टाईलमध्ये डान्स करताना दिसून येत आहे. तसेच डान्सनंतर सलमान गोरीला म्हणतो की तू खूप छान दिसत आहेस. ही ओळ गोरी राजस्थानी भाषेमध्ये म्हणताना दिसते आणि त्यानंतर सलमान ते वाक्य पुन्हा पुन्हा म्हणतो. या फनी प्रोमोला चाहत्यांतडून खूप पसंती दिली जात आहे.

गोरी नागोरी ही राजस्थानची शकीरा :
ज्याप्रमाणे हरियाणाची सपना चौधरी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे राजस्थानची गोरी नागोरी हे नाव देखील खूप लोकप्रिय झाले आहे. या दोन्ही डान्सर्स यूट्यूब आणि सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत त्याचबरोबर गोरी विशेषतः तिच्या बोल्ड स्टाईलमध्ये डान्स करण्यासाठी ओळखली जाते. तिची गाणी आणि नृत्य खूपच बोल्ड असते, तर फार पूर्वीपासून ती बिग बॉसमध्ये येणार असल्याचे बोलले जात होते पण अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. पण आता प्रोमोवरून स्पष्ट झाले आहे की ती शोमध्ये फुल मस्ती करण्यासाठी सज्ज आहे. शोचा प्रीमियर शनिवारी रात्री 9.30 वाजता रिलीज होणार आहे, ज्यामध्ये सर्व स्पर्धकांची नावे एक एक करून समोर येणार आहेत, जी आतापर्यंत गुप्त ठेवण्यात आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bigg Boss 16 new promo Salman Khan fun with Gori Nagori on grand premiere checks details 1 October 2022.

हॅशटॅग्स

Bigg Boss 16 New Promo(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x