28 January 2023 5:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hindenburg Report Adani Group | अदानी ग्रुपबाबत हिंडेनबर्गचा अहवाल 'अत्यंत विश्वासार्ह'!, दिग्गज अब्जाधीश विल्यम एकमन Numerology Horoscope | 29 जानेवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Bank Balance on WhatsApp | तुमच्या व्हॉट्सॲपवर समजेल तुमचा बँक बॅलन्स, जाणून घ्या प्रक्रिया Speciality Restaurants Share Price | रेस्टॉरंट चेन चालवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 170% परतावा दिला, आता स्टॉक नवीन टार्गेटच्या दिशेने Poonawalla Fincorp Share Price | करोडपती केलं या शेअरने! फक्त 22 हजारांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा, स्टॉक पुन्हा तेजीत Rama Steel Tube Share Price | परतावा असावा तर असा! या शेअरने 6 महिन्यांत 142% परतावा दिला, बाजार कमजोर पण स्टॉक तेजीत Pathaan Box Office Collection | पठाण चित्रपटाने तिसऱ्या दिवशी कमावले 36 कोटी, भारतात कलेक्शन 160 कोटींच्या पार
x

Ranbir Kapoor | रणबीर कपूरला भेटण्यासाठी चाहत्यांची गर्दी, अचानक अनेकजण खाली कोसळले, रणबीरने स्वतः केली विचारपूस, व्हिडिओ व्हायरल

Ranbir Kapoor

Ranbir Kapoor | बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नुकताच रिलीज झालेला अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपटाने चांगले कलेक्शन केले आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासून आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी चाहत्यांना अनोखे सरप्राईज देत आहेत. चित्रपटादरम्यान ते अचानक थेअटरमध्ये जात आहेत आणि चाहत्यांसोबत चित्रपटाचा आनंद घेत आहेत. दरम्यान, राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी मुंबईतील एका थिएटरमध्ये पोहोचले. यावेळी चाहते रणबीर कपूरला अनियंत्रित झाले आणि त्याला भेटण्यासाठी आतुर झाले.

रणबीरला पाहण्यासाठी चाहते बॅरिकेडवर पडले
दरम्यान, चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी मुंबईतील एका थिएटरमध्ये रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी पोहोचले होते. यावेळी रणबीरला पाहण्यासाठी चाहते अनियंत्रित झाले आणि अभिनेत्यासोबत फोटो क्लिक करण्याच्या प्रक्रियेत चाहते बॅरिकेडवर पडले. चाहते जेव्हा बॅरिकेडवरून खाली पडले तेव्हा रणबीर त्यांची विचारपूस करण्यासाठी पुढे सरसावला यावेळी चाहत्यांनी त्याचा व्हिडिओ बनवला. जो सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

राष्ट्रीय चित्रपट दिन
बॉलिवूड सृष्टीसाठी आजचा दिवस मोठा आहे. तर आज राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त ठाण्यातील एका सिनेमागृहात रणबीर कपूरचे आगमन झाले होते. यावेळी आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. काही जन रणबीर सोबत फोटो काढण्यासाठी पुढे सरसावले आणि बॅरिकेड्सवरून पडले. यावेळी रणबीरने चाहत्यांची चौकशी केली आणि हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. लोक अभिनेत्याचे कौतुक करत आहेत तर व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना यूजर्स रणबीरचे या कामाचे कौतुक करत आहेत.

चेन्नईमध्ये प्रमोशन वेळीचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, रणबीर कपूर जेव्हा त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे चेन्नईमध्ये प्रमोशन करण्यासाठी आला होता त्यावेळी तो नागार्जुन आणि फिल्ममेकर एसएस राजामौली यांच्या सोबत दिसून आला होता. त्यावेळी राजामौली हा चित्रपट दक्षिण भारतीय भाषेत सादर करत आहेत तर या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि यातील एका व्हिडिओमध्ये रणबीर राजामौली आणि नागार्जुन यांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हापासून चाहत्यांना रणबीरची ही शैली खूप आवडली आणि लोक त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ब्रह्मास्त्रची जगभरात 350 कोटींची कमाई
9 सप्टेंबर रोजी रिलीज झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपटाने जगभरामध्ये आत्तापर्यंत 350 कोटींची कमाई केली आहे तर नुकतेच रणबीरने सांगितले होते की, ब्रह्मास्त्र पार्ट 1-शिवाच्या बजेटमध्ये 650 कोटी रुपयांचा आकडा सांगितला जात आहे तो प्रत्यक्षात या फ्रेंचायझीच्या तीन चित्रपटांमध्ये विभागला गेला आहे. तसेच एका मुलाखतीत रणबीर म्हणाला होता की, “आजकाल आपण खूप वाचत आहोत जिथे लोक चित्रपटाच्या बजेटवर चर्चा करत आहेत आणि लोक म्हणत आहेत की इतके बजेट आहे आणि इतकी वसुली आहे, परंतु ब्रह्मास्त्र हा एक अनोखा चित्रपट आहे जिथे बजेट फक्त एका चित्रपटासाठी नाही तर संपूर्ण ट्रोलॉजीचे आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ranbir Kapoor Video Viral Checks details 24 september 2022

हॅशटॅग्स

Ranbir Kapoor(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x