5 February 2023 11:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PURE EV ecoDryft Bike | प्योर ईवी इकोड्रायफ्ट इलेक्ट्रिक बाइक, फुल चार्ज 135 किमी रेंज, कीमत आणि फीचर्स पहा My EPF Money | नोकरदारांनो! ईपीएफओचे नियम बदलले, पैसे काढण्यापूर्वी पहा किती टॅक्स आकारला जाणार Ration Card Updates | रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव जोडायचयं, महत्वाची अपडेट, आत्ताच ही काळजी घ्या LIC Share Price | हिंडेनबर्गमुळे अदानी ग्रुप हादरला, एलआयसी शेअर्सला सुद्धा मोठा फटका बसणार? तुमचे पैसे बुडणार? Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक, मिळतील अनेक फायदे आणि वेगाने संपत्ती वाढेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, रविवारी खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा My Salary Slip | पगारदार व्यक्ती आहात? तुमच्या पगाराच्या स्लिपमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो माहिती आहे? लक्षात ठेवा
x

Paytm Share Price | पेटीएम शेअरमध्ये तेजी येणार, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, म्युच्युअल फंड कंपन्यांकडून जोरदार खरेदी

Paytm Share price, Paytm IPO, Vijay Sharma, Goldman Sachs, Investment opportunities in stock, equity market, BSE, NSE, share market, stocks market,

Paytm share price| मागील आठवड्यात सलग तीन दिवस भारतीय शेअर बाजारात जबरदस्त मोठी घसरण पाहायला मिळाली. अश्या परिस्थितीत Paytm कंपनीचा शेअरमध्ये सुमारे 2 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती, आणि शेअर 698 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. Paytm चा IPO आल्या पासूनच या शेअरने त्याच्या गुंतवणूकदारांची घोर निराशा केली आहे. Paytm च्या IPO ची इश्यू किंमत 2080 रुपये ते 2150 रुपये दरम्यान ठरवण्यात करण्यात आली होती. तथापि, IPO निश्चित इश्यू किमतीच्या खाली सूचीबद्ध झाला होता. त्यानंतर Paytm कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत होती. अश्या घसरणीमुळे Paytm मध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांचे जबरदस्त मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आता Paytm बाबत एक सकारात्मक बातमी आली आहे.

ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँक “गोल्डमन सॅक्स”ने आपल्या अहवालात Paytm च्या स्टॉक मध्ये वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. Paytm च्या स्टॉकमध्ये 12 महिन्यांच्या टार्गेटसाठी गुंतवणूक केल्यास, येणाऱ्या काळात हा स्टॉक 1100 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत Paytm शेअरमधून 112 टक्केचा बंपर रिटर्न मिळू शकतो. त्याच वेळी, जर शेअर बाजारात मोठी घसरण झाली तर हा शेअर 12 टक्क्यांनी आणखी खाली पडेल. मागील आठव्यात शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी पडझड झाली आहे.

गोल्डमन सॅक्सचे मत काय ? Goldman Sachs च्या गुंतवणूक विश्लेषकांनी नुकताच असे म्हंटले आहे की, Paytm ही भारतीय इंटरनेट स्पेसमधील सर्वात आकर्षक कंपनी पैकी एक आहे. या कंपनीचे शेअर्स अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहेत. ग्लोबल रिसर्च आणि ब्रोकिंग हाऊसचे म्हणणे आहे की गुंतवणूकदारांनी Paytm चे शेअर्स सध्याच्या किमतीवर 12 महिन्यांसाठी 1,100 रुपयांच्या टार्गेट प्राईससाठी खरेदी करावे. बुल मार्केट मध्ये Paytm च्या स्टॉकमध्ये सध्याच्या किंमत पातळीपासून 112 टक्क्यांची वाढ होऊ शकते, नाही तर मार्केट पडला तर 12 टक्क्यांची पडझड होईल.

2150 रुपयेच स्टॉक 511 रुपयेवर : ज्या वेळी Paytm चा IPO आला होता, त्यावेळी पेटीएमच्या एका शेअरची किंमत 2,150 रुपये होती. 12 मे 2022 रोजी शेअरची किंमत 511 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली होती..Paytm ची उच्चांकी पातळी किंमत 1955 रुपये आहे. म्हणजेच Paytm च्या स्टॉकमे त्याच्या IPO इश्यू कधी स्पर्शच केला नाही. पण आता या स्टॉक मध्ये तेजी येऊ शकते. अशा परिस्थितीत या शेअर मध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना नक्कीच दिलासा मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Paytm Share price is ready to Increase as per Prediction of Goldman Sachs, on 24 September 2022

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x