20 September 2021 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता TCS, Infosys आणि Wipro सह मोठ्या IT कंपन्यांमध्ये नोकरभरती | १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ-बोनस मी कोल्हापूरात भाजप भुईसपाट केली | चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं - हसन मुश्रीफ भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल | 50 लाखांचे बेनामी उत्पन्न सोमय्या आता रश्मी ठाकरेंना लक्ष करताना त्यांच्या मालमत्तेवरून अलिबाग 'आरोप पर्यटन दौरा' करणार सोमैयांची आरोप पर्यटन यात्रा | मागील ३ दिवसांत ४ दौरे | सत्तेत असताना मुलुंडमध्येच असायचे व्यस्त सोमैयांकडून आरोप पर्यटनाला धार्मिक रंग | गणेश विसर्जनापासून रोखलं, हिंदूला रोखलं, आंबेबाईच्या दर्शनापासून रोखल्याची बोंब
x

२०१४ मध्ये सत्तेत येण्याची खात्री नव्हती, म्हणून आश्वासनं देत सुटलो: नितीन गडकरी

मुंबई : आम्हाला २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत सत्तेत येण्याची खात्री नसल्याने काही जणांनी मतदाराला आश्वासने द्यायला सांगितली. त्यानंतर आम्ही इतकी आश्वासने दिली लोकांना की ती आता आठवत सुद्धा नाहीत अशी कबुली खुद्द केंद्रीय दळणवळन मंत्री नितीन गडकरी यांनी मकरंद अनासपुरे यांच्या ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमा दरम्यान दिली. परंतु, त्यांच्या या विधानाने भाजपच्या अडचणी वाढणार असून गडकरींच्या या कबुलीने भाजपची एक प्रकारे पोलखोल झाली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आम्ही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करत असताना सत्तेत येऊ असे अजिबात वाटले नव्हते. दरम्यान, काही जणांनी आश्वासने द्यायच्या सूचना केल्या आणि आम्ही आश्वासन देत सुटलो असं गडकरी म्हणाले. तसेच राजकारणात शरद पवार काय बोलतील आणि काय करतील यावर माझा विश्वास नाही. शरद पवार कोणाला सुद्धा समजणार नाहीत, अशी गमतीदार कबुली त्यांनी पवारांच्या राजकारणावर बोलताना दिली. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यावर बोलताना गडकरी म्हणाले की, आठवलेंना कुठे काय बोलावे आणि कविता कधी म्हणावी ते समजत नाही. ते मुद्दाम करत नाहीत. पण त्यांच्याकडून अशा चुका होतात असं मत त्यांनी रामदास आठवलेंबद्दल बोलताना व्यक्त केलं.

नितीन गडकरींसोबत अभिनेते नाना पाटेकर सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरींनी म्हणाले की, पवारांना राजकारणात कोणीही ओळखू शकत नाही. पवार यांना कृषी, ग्रामीण, शैक्षणिक, पक्ष संघटन आणि सामाजिकसह सर्वच बाबींचे ज्ञान आहे. ही शरद पवार यांची जमेची बाजू असल्याचे सुद्धा गडकरी आवर्जून म्हणाले. परंतु, त्याच शरद पवार यांची खटकणारी बाब कोणती असे विचारले असता ते म्हणाले की, ते राजकारणात काय बोलतात आणि काय करतात हे कधीच कळत नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x