23 March 2023 11:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ChatGPT Job Effect | चॅट जीपीटी'मुळे या क्षेत्रातील नोकऱ्यांना प्रचंड धोका, कोणत्या नोकऱ्या सुरक्षित? लिस्ट मध्ये तुमची नोकरी कोणती? Accenture Job Loss | आयटी क्षेत्रात भूकंप, दिग्गज कंपनी अ‍ॅक्सेन्चर 19,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार OnePlus Nord CE 3 Lite 5G | वनप्लसचा 108 MP कॅमेरा असलेला स्वस्त Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन लाँच होणार, किंमत-फीचर्स? Hindenburg Report on Block Inc | अदानींनंतर हिंडनबर्गचा बॉम्ब या उद्योगपती फुटला, शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले Numerology Horoscope | 24 मार्च, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Deep Industries Share Price | या शेअरने 552 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या Sera Investment Share Price | लॉटरीच लागली! गुंतवणुकदारांना 454 टक्के परतावा दिल्यानंतर आता हा शेअर स्प्लिट होतोय
x

५०-५०च्या चर्चा झाल्या नसल्याचं मुख्यमंत्रीच बोलतात मग बैठक कशाला हवी: शिवसेना

Shivsena, BJP, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, MP Sanjay Raut

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०-५०च्या फॉर्म्युल्यावरून शब्द फिरवल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री शब्द फिरवत असतील तर बैठकीत कशावर चर्चा करायची? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना-भारतीय जनता पक्षाची मंत्रिमंडळ स्थापन्याबाबतची होणारी बैठक रद्द केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्रिपदावरून तणाव निर्माण झाला आहे.

संजय राऊत म्हणाले, “भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये संध्याकाळी ४ वाजता बैठक होणार होती. मात्र, मुख्यमंत्रीच जर स्वतः म्हणत असतील की फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर चर्चाच झाली नाही तर आम्ही या बैठकीत कशावर चर्चा करायची. कशासाठी आम्ही त्यांच्याशी बोलायचं. त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठकच रद्द केली आहे.”

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही समझौता होणार नसल्याचा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे. अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देऊ, असे कधीच कबूल केले नव्हते. १९९५चा फॉर्म्युला येईल वगैरे असे काहीही होणार नाही, मुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव आला होता, पण अशी कुठलीही बातचीत झाली नाही, असे अमित शहांनीही मला सांगितल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधली धूसफूस आणखी वाढली आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x