21 October 2019 4:16 PM
अँप डाउनलोड

जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा संघर्ष

अहमदनगर : दुष्काळजन्य परिस्थिती ओढावल्याने नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा पाणी संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. नाशिक जिल्ह्यांमधील धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून अहमदनगर – नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष सध्या सुरू आहे. अहमदनगर – नाशिकमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे जायकवाडीला पाणी देण्यास स्थानिक प्रतिनिधींचा आणि लोकांचा तीव्र विरोध होत आहे.

परंतु, राज्य पाटबंधारे विभागाच्यावतीने धरणात पाणी सोडण्याची तयारी सुरू झाली आहे असे वृत्त आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांची अकरा वाजता बैठक घेण्यात आहे. त्यामुळे या बैठकीनंतर पाणी सोडण्यात येणार का? यावर अंतिम निर्णय होणार असल्याचे समजते.

आजच्या बैठकीत राज्य पाटबंधारे विभाग, विजवितरण कार्यालय तसेच पोलीस सुरक्षा या संपूर्ण परिस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी घेणार असून त्यानंतर पाणी सोडण्यात येणार का? यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, याच विषयाला धरून आणि जायकवाडीला पाणी न देण्याच्या विरोधात दारणा धरणावर आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे पाणी सोडले गेले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी विशेष काळजी घेत असल्याचे समजते.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(313)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या