15 December 2024 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

केंद्राला सहकार्य न केल्यास घटनात्मक पेच निर्माण होईल; मुनगंटीवार यांचा इशारा

BJP MLA Sudhir Mungantiwar, NIA, Bhima Koregaon

पुणे: कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA कडे सोपवण्यात आला आहे. NIA ची टीम पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी विशेष चौकशी पथकामार्फत (SIT) या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. ज्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र २५ जानेवारीला हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्रलायने एनआयएकडे सोपवले.

दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने एल्गार परिषद गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्याचा निर्णय घेतला असला, तरी हा तपास ‘एनआयए’कडे देण्यास राज्य सरकार अनुत्सुक असल्याचे समजते. हा तपास ‘एनआयए’कडे देण्याबाबत राज्य सरकारकडून कायदेशीर सल्ला घेण्यात येत असून त्यानंतरच हा तपास ‘एनआयए’ करणार, की नाही, याचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, ‘एनआयए’च्या अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने सोमवारी पुणे पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून या गुन्ह्याची व्याप्ती समजून घेतली आहे.

एनआयएचे पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे यांच्यासह ८ जणांचे पथक तीन तास आयुक्तालयात होते. त्यांनी एल्गार परिषदेच्या तपासाप्रकरणी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त व शिवाजी पवार यांच्याकडून माहिती घेतली. राज्य सरकारने हा तपास एनआयएकडे सोपविल्याचे वा एनआयएला कागदपत्रे देण्याचे पत्र दिले नसल्याने आम्ही गृहविभागाकडून माहिती घेऊनच कागदपत्रे देऊ , असे पोलिसांनी त्यांना सांगितले.

मात्र याच मुद्यावरून भाजप आणि राज्य सरकारमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएकडे एल्गार परिषदेचा तपास वर्ग केल्याची माहिती समोर आली. परंतु, जर राज्याकडून संविधानाचा अवमान करणे, केंद्राला सहकार्य न केल्यास घटनात्मक पेच निर्माण होईल अशी शंका भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title:  So state government could be dismissed by Central Govt BJP leader Sudhir Mungantiwar warning.

हॅशटॅग्स

#Sudhir Mungantiwar(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x