26 July 2021 3:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

राज ठाकरे यांची कृष्णकुंज'वर पदाधिकाऱ्यांशी पुन्हा महत्वाची बैठक

CAA, MNS Party, Raj Thackeray

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका अशी सूचना पदाधिकाऱ्यांना केली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काल आयोजित करण्यात आली होती. रंगशारदा येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला राज ठाकरे मार्गदर्शन करणार होते. मात्र राज ठाकरे १० मिनिटांतच बैठकीतून निघून गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान राज ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्याने ते बैठकीतून निघून गेल्याचं सांगण्यात येत आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. परंतु त्यावरुन मनसेच्या नेत्यांमध्येच मतमतांतरं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज ठाकरे आज सलग दुसऱ्या दिवशी नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं वृत्त आहे. राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी सकाळी १० वाजता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. एनआरसीला पाठिंबा देण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ आहे. त्यासंदर्भातच ही बैठक असून पदाधिकाऱ्यांच्या शंकांचं निरसन होण्याचीही शक्यता आहे.

या मोर्चासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली असून त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहात आहोत, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. या बैठकी दरम्यान भारतीय जनता पक्षाचे नेते आशीष शेलार उपस्थित झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. मात्र आपण वैयक्तिक कारणासाठी आलो होतो, असे शेलार यांनी पत्रकारांना सांगितले.

 

Web Title:  MNS party meet today at Krushnakunj over 9 Feb CAA Morcha.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(670)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x