27 April 2024 5:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

नाईट लाईफ सोडा; इथे पोलिसांची 'लाईफ' घरातच असुरक्षित, स्लॅब कोसळत आहेत

Mumbai Police, Police Housing Issue

मुंबई: सध्या नाईट लाईफच्या विषयावरून मुंबई शहरातील वातावरण तापलं आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ड्रीम प्लांनिंग मधील नाईट लाईफ हा महत्वाचा प्रलंबित मुद्दा होता. त्यामुळे सरकारमध्ये विराजमान होऊन मंत्रीपद घेऊन त्यांनी प्रथम मुंबईतील नाईट लाईफला मार्गी लावलं आहे. विशेष म्हणजे या विषयावरून सर्वात मोठा ताण हा मुंबई पोलिसांवर पडणार असल्याने विरोधकांनी देखील त्याला विरोध केला आहे.

वास्तविक नाईट लाईफ’च्या निर्णयाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काही दिवस राज्याचं गृहमंत्री पद होतं. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई आयुक्तालयास देखील भेटी दिल्या होत्या. यावेळी पोलीस खात्याच्या आणि पोलीस कुटुंबियांच्या अडचणी समजून घेताना त्यांना पोलिसांना अत्याधुनिक सुविधा पुरविण्याचे वचन प्रसार माध्यमांच्या समोर दिले होते. मात्र, सरकारचे अग्रक्रम नक्की कोणत्या विषयांना आहेत ते समजणं कठीण झालं आहे.

कारण नाईट लाईफ’च्या निर्णयामुळे ज्या पोलिसांवर सर्वाधिक ताण पडणार आहे, त्याच पोलिसांची लाईफ त्याच्या मोडकळीस आलेल्या राहत्या घरात देखील सुरक्षित नसल्याचं दिसत आहे. मुंबईतील अनेक पोलीस वसाहतीतील पोलिसांच्या सरकारी घरांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचं दिसतं. कालच माटुंगा येथील पोलीस वसाहतीत अनेक घरांचे स्लॅब कोसळल्याने पोलीस कुटुंबीय देखील जखमी झाले आहेत. त्यामुळे सरकार पोलिसांना नेमक्या कोणत्या अत्याधुनिक सुविधा मुख्यमंत्री देणार आहेत असा प्रश्न पोलीस कुटुंबीय व्यक्त करत आहेत. सरकारला नाईट लाईफची चिंता आहे, मात्र आमच्या पोलीस कुटुंबीयांच्या लाईफची सरकारला खरंच जाण आहे असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. अनेक पोलीस कुटुंबीय अशा मोडकळीस आलेल्या घरांमध्ये जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत.

 

Web Title:  Police residence Slab collapsed in Matunga Police colony.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x