19 August 2019 3:37 AM
अँप डाउनलोड

अंधेरी पूल दुर्घटना: बेजवाबदार! दिल्ली ते गल्ली एकत्र सत्तेत असल्याचा शिवसेना व भाजपला विसर?

After Andheri Bride collapse both Shivsena and BJP is not taking responsibility

मुंबई : एल्फिन्स्टन ब्रिज सारख्या दुर्घटना घडून सुद्धा सरकारने काहीच बोध घेतलेला नाही. अंधेरी पूल दुर्घटनेवरून जवाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडून होताना दिसत आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अंधेरी पूल दुर्घटनेबाबत जवाबदारी झटकत त्या पुलाच्या देखभालीची जवाबदारी रेल्वे प्रशासनावर म्हणजे रेल्वे खात सांभाळणाऱ्या भाजपवर ढकलली आहे. तर भाजपचे खासदार किरीट सोमैया यांनी मला महापौर काय बोलले यात जायचे नाही, पण समस्यांचं निराकरण करण्यात जास्त रस आहे असं मत व्यक्त केलं आणि सेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

वास्तविक मुंबई महापालिकेत, राज्यात आणि केंद्र सरकारमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत असल्याचा दोन्ही पक्षांना विसर पडल्याचे एकूणच घटनेनंतर आलेल्या प्रतिक्रियांमधून समजते. वास्तविक एल्फिन्स्टन ब्रिज सारख्या दुर्घटना घडून सुद्धा सरकारने काहीच बोध घेतलेला नाही. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सुद्धा मोठं मोठ्या घोषणा तर केल्या होत्या, परंतु नंतर मुंबईमधील किती पुलांचे ऑडिट झाल हे मोठं रहस्य आहे.

एखादी घटना घडली की एकमेकांवर जवाबदारी ढकलून या घटनेला आम्ही जवाबदार नाही अशा अप्रत्यक्ष सूचना देणाऱ्या प्रतिक्रिया दोन्ही बाजूने यायला लागतात, हा मुंबईकरांना रोजचाच अनुभव झाला आहे. वास्तविक या दोन्ही पक्षांना तुम्ही दिल्ली ते गल्ली एकत्र सत्तेत आहात याची आठवण जनतेने करून देणे गरजेचे आहे, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

मराठी विवाह II अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Shivsena(519)BJP(412)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या