12 December 2024 8:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

निमंत्रण आले नाही तरी राम भक्त म्हणून उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का ? - रावसाहेब दानवे

BJP Leader Raosaheb Danave, CM Uddhav Thackeray, Ram Mandir

मुंबई, २१ जुलै : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजनाचा कार्यक्र्म पार पडणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे नक्की जातील असं सांगितलं आहे.

दरम्यान, भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडविण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. निमंत्रण आले नाही तरी राम भक्त म्हणून उद्धव ठाकरे अयोध्या जाणार का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलायं. हवं तर सरकारमधील सहकाऱ्यांची परवानगी घेऊन अयोध्येत जावं. भगवान रामांसाठी मानपान कसला आलाय. पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धवजींचे आता पहले सरकार फिर मंदिर असं वर्तन असल्याचे दानवे म्हणाले.

दूध उत्पादकांच्या आंदोलनाबाबत ते म्हणाले की, दूध प्रश्न मिटवण्यात राज्याला अपयश आलय. भाजपच्या आंदोलनामुळे आत्ता राज्य सरकार बैठका घेतंय. राज्यानं वेळीच लक्ष द्यायला पाहीजे होते असे दानवे म्हणाले. राजू शेट्टी आत्ताच आंदोलन का करत आहेत. राजू शेट्टींना आमदारकीसाठी पवारांकडे जावं लागत असल्याची टीकाही दानवेंनी केली.

 

News English Summary: While milk agitation is going on in the state, will Uddhav Thackeray go to Ayodhya?. Now BJP has tweaked Shiv Sena on that. Minister of State for Food and Civil Supplies Raosaheb Danve claimed that Uddhav Thackeray had failed at all levels. He said the state government had failed.

News English Title: BJP Leader Raosaheb Danave political attacked on CM Uddhav Thackeray News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x