मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाची साथ सोडून थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांसोबत महाविकास आघाडी स्थापून सरकार बनवल्याने शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कोंडीत सापडली आहे. त्यात मनसेने हिंदुत्वाच्या राजकारणाला सुरुवात केल्याने शिवसेना पेचात सापडली आहे.

त्यामुळे शिवसेनेने पुन्हा अयोध्या मंदिराचा मुद्द्याच्या आडून स्वतःची प्रतिमा पुन्हा उभी करण्यासाठी अयोध्या दौरा निश्चित केल्याचं समजलं जातं. तत्पूर्वी लोकसभा निवडुकीच्या तोंडावर सत्त्ताधारी एनडीए पक्ष राम मंदिराच्या मुद्यावर आक्रमक होताना दिसले होते. त्यात केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना विकासाच्या मुद्यावर तोंडघशी पडल्याने, त्यांनी केवळ अयोध्येतील राम मंदिरावर मोर्चा वळवला होता. सत्ताकाळात वाढलेल्या महागाईपासून सामान्यांचं परावृत्त करण्यासाठी शिवसेनेकडून केवळ राम मंदिरावर रोजच प्रतिक्रिया देण्याचा कार्यक्रम सुरु होता. त्याचे अनेक प्रत्यय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले होते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर आणि बाबरी जागेच्या विवादावर सुनावणी थेट जानेवारीपर्यंत पुढे ढकलली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी न्यायालयीन कालावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होतं. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत राहिलो तर १,००० वर्षे उलटून गेली तरी राम मंदिर काही होणार नाही,’ असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवला होता. मात्र आज त्याच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राम मंदिराचं काम सुरु झालं असून भाजपने ४ महिन्यात त्याच बांधकाम पूर्ण करण्याचं लक्ष गाठल्याने शिवसेना याचं श्रेय भाजपाकडे जाऊ नये नये म्हणून पुन्हा खटाटोप करत आहे असं राजकीय विश्लेषकांनी मत व्यक्त केलं आहे.

 

Web Title:  If we will depend on court decision then ram mandir will complete till one thousand years said Shivsena MP Sanjay Raut.

राऊत म्हणाले होते; कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहिल्यास राम मंदिर बनायला १,००० वर्षे लागतील