26 April 2024 7:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

अयोध्या दौरा: राऊतां'कडून पुन्हा ७ मार्च तारीख जाहीर; आधी १६ जुन जाहीर केली होती

Chief Minister Uddhav Thackeray, Ayodhya, Ram Mandir

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या ७ मार्च या दिवशी अयोध्येला जाणार असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे राऊत यांनी ट्विटद्वारे सांगितले होते. मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतील, त्याच प्रमाणे ते शरयू नदीतीरावर आरती करतील अशी माहितीही राऊत यांनी दिली.

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नव्हता, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर पडला होता. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर अनेक राजकीय उलथापालथ घडल्याचे दिसून आलं. त्यामुळे राज्यात नवे सरकार स्थापन होण्यास विलंब झाला. या निव़़डणुकीत भाजपा आणि शिवसेना महाय़ुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाल्याने शिवसेनेने भाजपाची साथ सोडली होती. त्यानंतर, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. पण, हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे विरोधकांकडून सांगण्यात येत आहे.

“काँग्रेसच्या हंगमी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राममंदिराच्या निकालाचं स्वागत केलं होतं. त्या ठिकाणी राममंदिर उभारलं जावं, अशी त्यांचीही धारणा होती, असं माझ्या वाचनात आणि ऐकीवात आलं होतं. त्यामुळे सल्ले देणाऱ्यांनी आधी माहिती घ्यावी आणि नंतर बोलावं,” असं ते एका विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. तत्पूर्वी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचा १६ जूनला अयोध्या दौरा होणार असल्याचं जाहीर केलं होतं.

 

Web Title:  Chief Minister Uddhav Thackeray will visit Ayodhya on 7 March declared Shivsena MP Sanjay Raut.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x