26 July 2021 3:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

मरणारा मासा तडफडतो, हे पुन्हा एकदा दिसलं; रुपाली चाकणकरांची मोदी सरकारवर टीका

Sharad Pawar Security, NCP Leader Rupali Chakankar

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीमधील निवासस्थानी असणारी सुरक्षा हटवण्यात आली असून सुरक्षा हटवण्याआधी केंद्र सरकारकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती असं सांगण्यात येत आहे. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान तैनात होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

परंतु २० जानेवारीपासून ही सुरक्षा हटवण्यात आली आहे. सुरक्षा काढण्याआधी कोणताही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती अशी माहिती शरद पवारांच्या दिल्लीमधील कार्यालयाकडून देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अतिमहत्त्वाच्या (व्हीव्हीआयपी) व्यक्तींना सुरक्षा पुरवली जाते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शरद पवारांची सुरक्षा हटविण्यात आली आहे. राज्यात शरद पवारांना झेड दर्जाची सुरक्षा आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारच्या टीका केली आहे. सरकार सुडबुद्धीने कसं वागतंय, लोकशाही मानत नाही, सुरक्षा व्यवस्था काढली म्हणून शरद पवार घराबाहेर पडणार नाहीत का? महाराष्ट्राच्या मनात भाजपाबाबत जो राग होता तो आणखी वाढण्यास मदत होईल अशा शब्दात आव्हाडांनी भाजपावर निशाणा साधला होता.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. सत्ताबदल होत असतात, सत्ताधारी बदलत असतात पण हे बदल खिलाडू वृत्तीने स्वीकाराले जावेत. पण भाजपा सरकारची मनोवृत्ती अतिशय अस्वस्थ, कुटील आणि दांभिक प्रवृतीची आहे. मरणारा मासा तडफतो, हे पुन्हा एकदा दिसलं, असं म्हणत राष्ट्रवादीच्या राज्य महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घणाघाती टीका केली आहे.

 

Web Title:  Rupali Chakankar targets Modi government over reducing Sharad Pawar security at Delhi.

हॅशटॅग्स

#NCP(361)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x