14 November 2019 1:04 PM
अँप डाउनलोड

मराठा आरक्षणावरून मेटेंची शरद पवारांवर टीका, पण 'या' विडिओ'ने विनायक मेटे तोंडघशी पडण्याची शक्यता

पुणे : भाजपच्या गोटात सामील झालेले विनायक मेटे सध्या पवार कुंटुंबियांवर मराठा आरक्षणावरून टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. नुकतंच त्यांनी थेट शरद पवारांच्या बाबतीत एक विधान केलं आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या तोंडावर शरद पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नं केला.

दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती आवश्यक आहे, असे मत शरद पवारांसह अनेक नेत्यांनी मांडले होते. मात्र शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे म्हणाले,’शरद पवारांनी शक्य असूनही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, शरद पवारांनी शक्य असूनही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही असं विधान करत पवारांच्या अडचणी वाढविण्याचा प्रयत्नं केला.

परंतु याच विनायक मेटेंचा २०१६ मधील सद्भावना यात्रेतील जुना विडिओ सध्या समाज माध्यमांवर वायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे बोलत आहेत की,’मराठा आरक्षणासाठी खऱ्या अर्थाने जर कोणी मदत केली असेल तर ती अजित पवार यांनीच’. या विधानाने विनायक मेटे तोंडघशी पडण्याची शक्यता असून राष्ट्रवादीच्या हाती मोठा पुरावा लागल्यात जमा आहे.

सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर मोठ आक्रमक आंदोलन उभा राहील आहे. त्यात अनेक ठिकाणी हिसाचार दिवसेंदिवस उफाळून येताना दिसत आहे. त्यात सर्वच पक्षांचे अनेक नेते वादग्रस्त विधानं करून माध्यमांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यात काही आंदोलकांनी आत्महत्या केल्याने मराठा समाजातील तरुणांच्या रोषाचा अधिक भर पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

VIDEO – मराठा आरक्षण आणि अजित पवारांबद्दल काय म्हटलं होत विनायक मेटेंनी २०१६ मधील सद्भावना यात्रेत?

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(198)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या