14 December 2024 11:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजप सावध | पंकजा मुंडे आणि तावडेंना प्रभारीपद

BJP, officially announces, state in charges

नवी दिल्ली, १४ नोव्हेंबर: भारतीय जनता पक्षाने 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रभारी व सह प्रभारींची यादी जाहीर केली आहे (BJP Party announced state in charges). पक्षाने जाहीर केलेल्या यादीनुसार माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंकजा मुंडे (Former Minister Pankaja Munde) यांची मध्य प्रदेश सह प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विनोद तावडे (Former Minister Vinod Tawde) यांची हरियाणा प्रदेश भारतीय जनता पक्ष प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. तसेच सुनील देवधर यांची आंध्र प्रदेश सह प्रभारीपदी नियुक्ती केली असून, विजया रहाटकर यांना दमन दीव-दादरा-नगर हवेली प्रभारीपदी नियुक्ती दिली आहे.

भारतीय जनता पक्षानं शुक्रवारी ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रभारी तसंच सह-प्रभारींची यादी जाहीर केलीय. यात माजी केंद्रीय मंत्री राधा मोहन सिंह यांना उत्तर प्रदेशचं प्रभारी म्हणून घोषित करण्यात आलंय. राधा मोहन सिंह यांच्यासोबत उत्तर प्रदेशात तीन सह-प्रभारी नियुक्त करण्यात आलेत. यात सुनील ओझा, सत्या कुमार आणि संजीव चौरसिया यांच्या नावाचा समावेश आहे.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा (BJP National Spokesperson Sambit Patra) यांना पक्षानं मणिपूरची जबाबदारी देत प्रभारी पद सोपवलं आहे. तर नलिन कोहली यांना नागालँडचं प्रभारी पद दिलं गेलंय. दरम्यान, महाष्ट्रात एकनाथ खडसेंनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपचं नैतृत्व सावध झालं असून पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं आहे.

 

News English Summary: The BJP has announced a list of in-charges and co-in-charges for 36 states and union territories (BJP announced state in charges). According to the list released by the party, former Union Minister Radhamohan Singh has been given charge of Uttar Pradesh. Former Minister Pankaja Munde has been appointed in-charge with Madhya Pradesh. Former Minister Vinod Tawde has been appointed in-charge of Haryana Pradesh Bharatiya Janata Party. Also, Sunil Deodhar has been appointed in charge of Andhra Pradesh and Vijaya Rahatkar has been appointed in charge of Daman Diu-Dadra-Nagar Haveli.

News English Title: BJP officially announces list of state in charges News updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x