2 May 2024 3:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

संतापजनक | मुंबईतील भाजपा कार्यालयात बोलावून भाजप पदाधिकाऱ्याचा महिला कार्यकर्तीवर अत्याचाराचा प्रयत्न | गुन्हा दाखल

BJP Maharashtra

मुंबई, २३ सप्टेंबर | राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या अनेक घटना वाढत आहेत. त्यात नुकताच मुंबईत साकीनाका परिसरात बलात्काराची घटनाही उघडकीस आली आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना.

मुंबईतील भाजपा कार्यालयात बोलावून भाजप पदाधिकाऱ्याचा महिला कार्यकर्तीवर अत्याचाराच प्रयत्न, गुन्हा दाखल – Atrocity by Mumbai BJP leader on women activists of his own party in Mumbai BJP corporator’s office :

दुसरीकडे मुंबईत एक धक्कादायक घटना घडल्याने भाजप पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसेच सत्ताधाऱ्यांना मोठी संधी मिळाल्याने भाजपच्या नेत्यांची तोंडं बंद होतील असा संतापजनक प्रकार थेट मुंबई भाजपच्या कार्यालयात घडला आहे. मुंबईच्या बोरीवलीत भाजप पदाधिकाऱ्यांने त्यांच्याच पक्षातील महिला नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेला बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

म्हणून पोलिसांत केली तक्रार:
पक्षात पद देतो, असे सांगून स्थानिक भाजपा पदाधिकारी प्रतीक साळवी याने एका महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेल्या तक्रारीवरून बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महिलेने याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रारही केली होती. मात्र, याची दखल न घेतल्याने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Atrocity by Mumbai BJP leader on women activists of his own party in Mumbai BJP corporator’s office.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x