26 July 2021 3:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

नसिरुद्दीन शहा आणि स्वरा भास्कर हे स्लीपर सेल: योगेश सोमण

Yogesh Soman, Naseeruddin Shah and Swara Bhaskar

पुणे: अभिनेते नसिरुद्दीन शहा, दिग्दर्शक फरहान अख्तर, अभिनेत्री स्वरा भास्कर हे स्लीपर सेल असल्याचे खळबळजनक वक्तव्य अभिनेते योगेश सोमण यांनी केले आहे. पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत त्यांनी हे वक्तव्य केले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ ही वर्षानुवर्षांची विषवल्ली आहे. या संस्थांमध्ये विष पेरून पिढ्या तयार केल्या जात आहेत. हे स्लीपर सेलच्या माध्यमातून होत असून नसिरुद्दीन शहा, फरहान अख्तर, स्वरा भास्कर हे या स्लीपर सेलचे सदस्य असल्याचे सोमण यांनी म्हटले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आता आपण ठरवल्याप्रमाणे समान नागरी कायदा येणार आहे. जेएनयूसारखं विचित्र पद्धतीने आंदोलन झाल्यास तसंच ठाम आणि आक्रमक पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे. मी संघर्षाला प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहे. राजकीय पक्ष आपला जाहीरनामा तयार करतात. मात्र हे जाहीरनामे पक्ष कार्यालयात धूळखात पडतात. काँग्रेसचा जाहीरनामा तर मुंबईत भेळ विक्रीसाठी वापरल्याचं पाहायला मिळालं. भेळ विक्रेत्याला हा कचऱ्यात फुकट मिळाला असल्यानं तो पुड्या तयार करत असेल. अशा पद्धतीनं जाहीरनाम्याची नाही, तर विचारांची विल्हेवाट लावली जात असल्याचा आरोप सोमण यांनी केला.

योगेश सोमण यांनी आपल्या भाषणातून भाजपचे कौतुक केले. भाजपने देशहितासाठी अनेक निर्णय घेतले. विरोधकांनी सर्जिकल स्ट्राईक आणि जीएसटीची खिल्ली उडवली. परंतु त्यानंतरही २०१९च्या निवडणुकीत भाजप पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळवत बहुमताने सत्तेत आले. मध्यंतरी अनेकांनी पुरस्कार वापसी सुरू केली होती. मात्र या पुरस्कार वापसीजा बोजा उडाल्याने पुरस्कार वापसकर्ते डोक्याला हात लावून बसले आहेत. पुरस्कार वापसी करणाऱ्यांनीच विद्यार्थ्यांना हाताशी धरून विरोध सुरू आहे आणि त्याला बाहेरून फंड मिळत असल्याचा आरोप देखील सोमण यांनी यावेळी केला.

 

Web Title:  Naseeruddin Shah and Swara Bhaskar are sleeper cell says actor Yogesh Soman.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(647)#RSS(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x