26 April 2024 5:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

पवारसाहेब तुमच्यासारखा मोठा माणूस माहिती न घेता बोलतो याचं आश्चर्य वाटतं: निलेश राणे

NCP President Sharad Pawar, Former MP Nilesh Rane, Ram Madir Nirman Trust

सिंधुदुर्ग: अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टची बुधवारी दिल्लीमध्ये पहिली बैठक पार पडली. या ट्रस्टवरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला सवाल केला आहे. ‘राम मंदिराच्या उभारण्यासाठी ट्रस्ट तयार करु शकता तर मशिदीसाठी का नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.

“तुम्ही जसं राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना करू शकता, मशिदीच्या उभारणीसाठी ट्रस्ट का निर्माण करू शकत नाही ? देश तर सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे.” असं शरद पवार म्हणाले होते. ‘एएनआय’ने या संदर्भात वृत्त दिलं होतं.

मात्र त्यानंतर पवारांवर विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत पवारांना सुन्नी वक्फ बोर्डाने ‘ऐतिहासिक इंडो इस्लामिक कल्चर ट्रस्ट’ या नावाने एक ट्रस्ट स्थापन केल्याची आठवण करत रोखठोक प्रश्न केला आहे. ट्विट मध्ये निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, ‘पवारसाहेब हे बघून घ्या जरा आणि आपल्यासारखा इतका मोठा माणूस माहिती न घेता बोलतो ह्या गोष्टीच आश्चर्य वाटतं’ असं म्हटलं आहे.

ज्या दिवशी नरेंद्र मोदी सरकारने राममंदिराच्या उभारणीसाठी एक ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा केली, तेव्हा सुन्नी वक्फ बोर्डाने ‘ऐतिहासिक इंडो इस्लामिक कल्चर ट्रस्ट’ या नावाने एक ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. ऐतिहासिक अयोध्या जमीन विवाद प्रकरणात सुन्नी वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेली ५ एकर जमीन ‘इंडो इस्लामिक कल्चर ट्रस्ट’ नावाच्या ट्रस्टद्वारे चालविली जाईल, अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली होती. लवकरच तशी ट्रस्ट तयार स्थापन करून त्यानंतर काही दिवसांत नोंदणी करू, असे वक्फ बोर्डाने सांगितले होते.

नेमका त्याच विषयाचा धागा पकडून माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळे यावर शरद पवार कायम राहणार की विषयाला बगल देणार ते पाहावं लागणार आहे.

 

Web Title: Story Former MP Nilesh Rane critizized NCP President Sharad Pawar over forming Trust for Babri.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x