25 March 2025 4:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 26 मार्च 2025; तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल, बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 26 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी अपडेट, सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या FD मध्ये पैसे गुंतवा, मोठा परतावा मिळवा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: TATAMOTORS Rattan Power Share Price | 9 रुपयांचा पेनी स्टॉक, यापूर्वी 586 टक्के परतावा दिला, पॉवर कंपनी फोकसमध्ये - NSE: RTNPOWER IREDA Share Price | 172 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार, इरेडा शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA Wipro Share Price | विप्रो शेअर मालामाल करणार, CLSA ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या – NSE: WIPRO
x

माझ्या ट्वीटचा गैर अर्थ काढला; नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही: निलेश राणे

Former MP Nilesh Rane, MLA Nitesh Rane, MP Narayan Rane, Shivsena

मुंबई : प्रसार माध्यमांनी माझ्या ट्वीटचा गैर अर्थ काढला, नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही. पण ज्या दिवशी शिवसेना राणेसाहेबांची बदनामी थांबवेल, तेव्हा माझा आणि शिवसेनेचा विषय संपेल, अशी भूमिका माजी खासदार निलेश राणे यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी बंधू नितेश राणे यांनी दाखवली असतानाच निलेश राणे यांनी ट्विटरवरुन असहमती दर्शवली होती.

‘कालच्या माझ्या ट्विटचा मीडियाने गैर अर्थ काढला असून नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही. नितेशनी मला जे अधिकार दिले त्यातून मी त्याला समजवले. राहिला विषय शिवसेनेचा, ज्या दिवशी शिवसेना राणे साहेबांची बदनामी आणि त्रास देणे थांबवेल त्यादिवशी शिवसेनेचा आणि माझा विषय संपेल.’ असं ट्वीट निलेश राणेंनी केलं आहे.

शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातील राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेने युतीधर्म मोडून येथे आपल्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभा केला आहे. मात्र असे असले तरी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत सकारात्मक मत व्यक्त केलं होतं. विधानसभेच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे आणि माझी भेट व्हावी. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. यावर निलेश राणेंनी नितेशच्या भूमिकेला विरोध केला होता.

निलेश राणेंनी सांगितलं होतं की, ज्या पक्षानी राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरूनच करणार. पण त्यानंतर ज्या दिवशी शिवसेना राणे साहेबांची बदनामी आणि त्रास देणे थांबवेल त्यादिवशी शिवसेनेचा आणि माझा विषय संपेल अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या