21 November 2019 7:23 AM
अँप डाउनलोड

सेना-भाजप 50-50, विधानपरिषद निवडणुकीसाठी मनो-मिलन झालं

मुंबई : जनतेला खुश करण्यासाठी एकमेकांना स्वतंत्र निवडणुका लढण्याचा इशारा देणारे निवडणूक येताच ५०-५० फॉर्म्युला निश्चित करत पुन्हां एकत्र आले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजपचा ५०-५० फॉर्म्युला निश्चित झाला आहे. तर गोंदिया-भंडारा आणि पालघर लोकसभा निवडणुकीसाठी सध्या विचारविनिमय सुरु आहे.

२०१४ पासूनच शिवसेना आणि भाजपचं हे राजकारण महाराष्ट्रासाठी नित्याचेच झाले आहे. निवडणूक लागल्या की लगेच ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना’ असच काहीस शिवसेना आणि भाजपचं सुरु आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजपच एकमत झाले असून उस्मानाबाद-लातूर-बीड, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून भाजप लढणार असून नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार उभे राहणार आहेत. दोन्ही पक्षांमध्ये ५०-५० फॉर्म्युला निश्चित झाला आहे.

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या