12 August 2020 9:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

देशात सर्व गावांमध्ये विजेचा मोदींचा दावा फोल ठरला

तामिळनाडू : केंद्र सरकार निवडणुका जवळ आल्याने प्रगतीचे खोटे दावे करत असल्याचे तामिळनाडूतील जनतेने समोर आणले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व गावांमध्ये वीज पोहोचविल्याचा दावा केला होता.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

तामिळनाडूतील आदिवासी पीपल्स असोसिएशनचे व्ही. एस. परमाशिवम म्हणाले, “आम्ही वीजविरहीत टेलिव्हिजन सेट आणि मिक्सर ग्राइंडर वापरतो”. कारण आमच्या जिल्ह्यातील २० आदिवासी जमातींमध्ये जवळपास ४००० कुटुंबे ही रविवारी केंद्र सरकारने केलेल्या वीजपुरवठ्याच्या घोषणेत दिसत नाहीत. केंद्र सरकार म्हणत आम्ही देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचवली आहे आणि देशातील कोणतेही गाव आता अंधाराखाली नाही.

तामिळनाडूच्या अनामलाई टायगर रिझर्व फॉरेस्टमध्ये स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही अलियार-सिन्नरपथी, नवमाळई, केळपूनछी, मारापलम आणि व्हीएटीकरनपुधुर-नगररूतु, एरुम्पेराई, पौमथी येथील डोंगराळ भागातील जनता आज सुद्धा अंधारात आहे.

तामिळनाडू मधील हे एक उदाहरण असून अशी अनेक गावांमध्ये आज सुद्धा विज नाही हे कटू सत्य आहे. जर गावामधील हे वास्तव असेल तर केंद्र सरकार हास्यास्पद दावे करून नक्की काय साधते हाच येथील स्थनिकांना प्रश्न पडला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x