25 April 2024 10:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

वादळग्रस्त कोकणी माणसाचे प्रश्न घेऊन फडणवीस मुख्यमंत्र्यांना भेटले

CM Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Nature Cyclone

मुंबई, १३ जून : नुकसानग्रस्तांना तातडीने रोख रक्कम म्हणून मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर फडणवीस यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर केलं. यावेळी फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार देखील उपस्थित होते.

अधिक माहिती देताना फडणवीस म्हणाले, यावेळी आपण मुख्यमंत्र्यांसमोर कोकणातलं सर्व सत्य मांडलं. तेथील वादळग्रस्तांना मदतीचा एक रुपयाही मिळाला नाही. त्यामुळे सरकारचं अस्तिव्त कुठे दिसत नसल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. यासह सरकारने नुकसानग्रस्त भागात वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा, मच्छिमारांना बोट दुरुस्तीसाठी २ लाख द्यावे, मच्छिमारांची सर्व कर्ज माफ करावीत, छोट्या दुकानदारांना सरकारने मदत द्यावी, ज्यांची घरं पडलेली आहेत त्यांना वर्षभराचं भाडं द्यावं, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांकडे फडणवीसांच्या या मागण्या

  • वादळग्रस्तांना घरभाडं द्या
  • मच्छीमारांना कर्जमाफी द्या
  • फळबाग मालकांना अधिकची मदत द्या
  • मच्छिमारांना डिझेल परतावा द्या
  • छोट्या दुकानदारांना मदत द्या
  • रेशनचे धान्य तात्काळ उपलब्ध करून द्या
  • केरोसिन उपलब्ध करून देण्याची घोषणा, पण अजूनही मिळालं नाही. तेही तत्काळ द्या
  • पेणच्या गणेशमूर्तीकारांना मदत द्या
  • घरबांधणीसाठीचे दीड लाख रुपये कमी, ग्रामीण भागासाठी २.५० लाख आणि शहरी भागासाठी ३.५० लाख रुपयांचे अनुदान द्या
  • बागायतदारांना ५० हजार हेक्टरी मदत अत्यंत कमी. बागांचं नुकसान झाल्यामुळे पुढचं १० वर्ष उत्पन्न बुडणार आहे. सरकारने गुंठ्याला ५०० रुपये मदत दिली आहे. बाग साफ करायलाच मोठा खर्च येणार आहे.
  • १०० टक्के अनुदानातून फळबाग योजना लागू करा
  • पर्यटन व्यवसायासाठी सरकारने कर्जाची हमी घेऊन यांना दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून द्यावं
  • केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत मासेमारी आणि फळबाग यासाठी अनेक योजना घोषित केल्या आहेत. त्याचा लाभ प्राधान्यक्रमाने कोकणाला कसा मिळेल, यादृष्टीने तातडीने नियोजन करावे
  • शाळा/समाजभवन/वाचनालये असे अनेक सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. त्यांनाही तातडीने मदत करण्यात यावी.
  • जनावरांच्या चार्‍याचा मोठा प्रश्न तयार झाला आहे. सुका चार्‍याची उपलब्धता करून देण्यात यावी.

 

News English Summary: Opposition parties have demanded that Chief Minister Uddhav Thackeray should immediately provide cash assistance to the victims. After inspecting the damage caused by the cyclone, Fadnavis called on the Chief Minister today.

News English Title: After inspecting the damage caused by the Nature cyclone Fadnavis called on the Chief Minister today News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x